35.9 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home विदर्भ वाहतूक शाखेची २८१ दुचाकी वाहनांवर कारवाई, २ लाख ६६ हजाराच दंड

वाहतूक शाखेची २८१ दुचाकी वाहनांवर कारवाई, २ लाख ६६ हजाराच दंड

0
226

blank

अल्पवयीन मुलांच्या पालकांना वाहतुक शाखेची नोटीस

गोंदिया,दि.२१ः : जिल्ह्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 281 वाहन चालकांवर जिल्हा वाहतूक शाखा,रामनगर,शहर व ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कार्रवाईमध्ये कारवाई करुन 103 वाहन जप्त करण्यात आली.या वाहन चालकांवर 2 लाख 66 हजार 750 रुपयांचा दंड ठोठवण्यात आल्याची माहिती आज २१ डिसेंबरला जिला वाहतुक शाखेत आयोजित पत्रपरिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी दिली.यावेळी परिविक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी मेहर,वाहतुक शाखेचे प्रभारी पोलीस निरिक्षक नागेश भाष्कर,सहायक पोलीस निरिक्षक राहुल पाटील उपस्थित होते. पोलीस अधिक्षक व अप्पर पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या दुचाकी स्वारांवर विशेष मोहिमे अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापुढेही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर जिल्हा वाहतुक शाखेतर्फे संपुर्ण जिल्हयात वेळोवेळी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन केले आहे. सदरची विशेष मोहीमे दरम्यान सपोनि राहुल पाटील जिल्हा वाहतुक शाखा गोंदिया, सपोनि गेडाम पो. स्टे. गोंदिया शहर, महिला पोलीस उपनिरीक्षक शेख पो. स्टे. गोंदिया ग्रामीण, महिला पोलीस उप निरीक्षक नेहे पो. स्टे. रामनगर, पोलीस उपनिरीक्षक बागुल पो. स्टे. रावणवाडी तसेच पेट्रोलिंग पथकातील सफौ रविंद्र भुरे व जिल्हा वाहतुक शाखेतील संपुर्ण पोलीस अंमलदार यांनी या कारवाईत प्रत्यक्ष सहभाग घेवुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर उत्कृष्टरीत्या कारवाई केलेली आहे.