सांगली/संख( राजेभक्षर जमादार ): कर्नाटकच्या बंगळूर जिल्ह्यातील नेलमंगल महामार्गावर भरधाव कंटेनर चालत्या गाडीवर कोसळल्यानं एकाच कुटुंबातील सहा जण चिरडून ठार झाले (Sangli Accident News) आहेत. मृत हे सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील मोरबगी गावातील आहेत. ख्रिसमसच्या सुट्टीसाठी गावी येत असताना हा भीषण अपघात घडला आहे.मृतामध्ये चंद्रम इगाप्पागोळ (वय 45), त्यांची पत्नी धोराबाई (वय 40) मुलगा गण (वय 16), मुली दिक्षा (वय 10), आर्या (वय 6), चंद्रम एगाप्पागोळ भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी (वय 35) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रम इगाप्पागोळ ( वय 46) हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावातील रहिवासी होते. ते बंगळुरूच्या एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होते. ख्रिसमसच्या सुटीनिमित्त चंद्र इगाप्पागोळ व त्यांचे कुटुंबीय तसेच त्याच्या भावाची पत्नी बंगळुरू येथून जत तालुक्यातील गावी जात होते.दोन कंटेनर ट्रकच्या धडकेनंतर एक कंटेनर कार आणि दुचाकीवर पलटी झाला, त्यामध्ये चिरडून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.कंटेनर ट्रकचे वजन जास्त असल्याने कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि कारच्या आत असलेले लोक चिरडले गेले. त्यामुळे कारमधील सर्वांचा जागीच मृत्यू झाला.