32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News पोलीस होण्याचं स्वप्न भंगलं;सराव करताना एसटीनं ३ तरुणांना चिरडले;तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

पोलीस होण्याचं स्वप्न भंगलं;सराव करताना एसटीनं ३ तरुणांना चिरडले;तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

0
249

blank

बीड:-पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तरूण दिवसरात्र सराव करतात. मात्र असाच पोलीस भरतीसाठी सराव करत असताना बीडमध्ये एसटी बसने तीन तरूणांना चिरडल्याची ह्रदयद्रावक घटना आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात तीन तरूणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या ५ तरुणांना भरधाव वेगातील एस टी बसने चिरडले. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांचा जीव वाचला. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. बीडच्या घोडका राजुरी फाट्यावरील आज सकाळी साडे सहाच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. या अपघातामुळे घोडका राजुरी गावावर शोककाळा पसरली आहे. पोलीस होण्याचे स्वप्न त्या तरूणाचे भंगले आहे. पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तरूण पहाटे धावण्याचा सराव करतात. सकाळी रस्त्याच्या बाजूने तरूण धावत सराव करतात. दररोज ज्या रस्त्यावर धावतात, त्याच रस्त्यावर त्यांचा जीव गेलाय. बालाजी मोरे, ओम घोडके, आणि विराज घोडके अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे तिघे पोलिस भरती करत होते. यासाठी रोज सकाळी ते बीड परळी मार्गावर व्यायाम करण्यासाठी एकत्र येत असे. आज सकाळी देखील हे तिघे मित्र व्यायाम करण्यासाठी बीड परळी मार्गावर एकत्र आले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव एसटीने त्यांना धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार आज रविवारी सकाळी बीड परळी महामार्गावर सकाळच्या सुमारास पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी हे तीन तरुण व्यायाम करत होते. हे तिघे नेहमीप्रमाणे पहाटे व्यायाम करण्यासाठी जात असताना यावेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसने त्यांना धडक दिली. घोडका राजुरी गावाजवळ हा अपघात झाला. बसखाली सापडल्याने या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तातडीने ग्रामस्थांनी या तिघांना दवाखान्यात भरती केलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. त्यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर नातेवाइकांनी आक्रोश केला. त्यांनी दवाखान्यात जात टाहो फोडला. पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले असून अपघात नेमका कसा झाला याच शोध पोलिस घेत आहे. हा अपघात बस सिमेंटच्या रस्त्यावरून खाली घसरून झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

blank