वडिलांचा मृतदेह घरात असताना दिला दहावीचा पेपर

0
379

गोंदिया : दहावीची परीक्षा हा टप्पा जीवनात खूप महत्त्वाचा असतो. अशावेळी आपला आधारवडच हरपणे आणि तेही परीक्षेच्या दिवशीच हे दु:खदच. मात्र, हे दु:ख सहन करीत गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील आदेश ठानेश्वर कटरेने काळजावर दगड ठेवून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सकाळी 11 वाजता दहावीच्या पेपरला हजर राहिला आणि एका तासात पेपर देऊन घरी परतला.आणि वडिलाला खांदा देत अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडत साश्रूनयनांनी निरोप दिला.

इयत्ता १०वीत असलेल्या आदेशचा आज मराठी विषयाचा पहिलाच पेपर होता.त्यातच वडील ठानेश्वर कटरे यांचा आज शुक्रवारला २१ फेब्रुवारीला पहाटे आकस्मिक निधन झाले.वडिलांचा मृतदेह दारात असताना परिक्षेला जावे तरी कसे?या प्रश्नाने घोळ झालेला असतानाच पेपरला गैरहजर राहिल्याने पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाणार हे लक्षात येताच आदेशने मन घट्ट करुन वडिलांचा मृतदेह दारात असताना पेपर देण्याचा निर्णय घेतला.आणि मोहाडी येथील परीक्षा केंद्रावर जाऊन मराठीचा पेपर दिला.आणि पेपर संपल्यानंतर घरी येत वडिलांवर अंत्यसंस्कारांचे सोपस्कार पुर्ण केले.

वडील हेच शेवटचे परमेश्वर. नापास झालो तर परीक्षा पुन्हा देता येईल. वडिलांसोबत हा शेवटचा प्रवास. वडिलांना साथ द्यावी लागेल या आत्मविश्वासात आदेश मोहाडी येथून मराठीचा पेपर एक तासात सोडून घरी माघारी परत आला. वडिलांच्या मृतक शरीराला त्यांनी खांदा दिला.या सर्व संवेदनशील प्रसंगाचे गावकरी साक्षीदार झाले. आदेशला परीक्षेसाठी परीक्षा देण्यासाठी शिक्षक रमेश बिसेन व क्षत्रिय पवार समाज संघटनेचे सचिव मोरेश्वर चौधरी यांनी प्रोत्साहित केले.