साकोली,दि.२१ : ओबीसी सेवा संघ, तालुका शाखा साकोलीच्या वतीने आज २१ फेब्रुवारीला ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.या निवेदनात २०१९ पासून ओबीसी विद्यार्थ्यांची प्रिमॅट्रिक व मॅट्रिकत्तर शिष्यवृत्तीची थकीत रक्कम (१९ कोटी) त्वरित देण्यात यावी.शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांना निर्वाह व भोजन भत्ता नियमितपणे मिळावा.ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आधार योजनेची अंमलबजावणी तातडीने करावी.ओबीसी विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृहांचे बांधकाम लवकर सुरू करावे.ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी.मराठ्यांच्या ओबीसीकरण संदर्भात नेमलेल्या शिंदे समितीची मुदत वाढ रद्द करावी.यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ९८५ ओबीसी विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने तातडीने सेवेत रुजू करावे आदी मागण्यांचा समावेश होता.निवेदन देतेवेळी ओबीसी सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सेवकराम हटवार, सचिव दिनेश शिवणकर, कार्याध्यक्ष चंद्रकांत सारंगपुरे, उपाध्यक्ष धनराज कापगते, कोषाध्यक्ष सुनील पटले, प्रसिद्धी प्रमुख विलास करंजेकर, सहसचिव सुरेश धकाते, संपर्क/संघटन प्रमुख कृष्णा करंजेकर, मार्गदर्शक/ संघटक संजीव खंडाईत, सुरेश हर्षे, नरेंद्र गायधने, हेमराज भाजीपाले आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.