माॅयल खाणीत स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली दबुन दोन कामगारांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

0
27

तुमसर (Bhandara) :- केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असलेल्या तुमसर तालुक्यातील चिखला येथिल भुमीगत माॅयल खाणीत वर्टीकल दोन अंडरग्राऊंड लेव्हल ३ मध्ये १०० मिटर खोली असलेल्या ठिकाणी सकाळ पाळीत भुमीगत खाणीत काम करीत असलेल्या तीन कामगारांवर येथिल स्लॅब (Slab)क़ोसळल्याने त्यात ढिगाऱ्याखाली दबलेल्या दोन कामगारांचा जागिच मृत्यू (Death)झाला. तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना ५ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान घडली. सदर घटनेने माॅयल खाण प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे व येथिल माॅयल खाणीतील सुरक्षितेवर व कामगारांच्या सुरक्षितेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. ‌

स्थानीक माहीती नुसार ५ मार्च रोजी घटनेच्या दिवशी सकाळ पाळीत येथिल चिखला माॅयल भुमीगत खाणीत तीन कामगार काम करीत असताना अचानकपणे त्यांच्या अंगावर स्लॅब क़ोसळल्याने त्यात दोन कामगारांचा जागीच  मृत्यू झाला तर तीन एक जखमी झाल्याची घटना घडली. सदर घटनेत विजय नंदलाल वरखडे, (५०) रा.खरपडी तिरोडी व अरुण जिवनलाल चोरमार(४१)रा.सिंतासांवगी असे मलब्याखाली दबुन मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहेत. तर शंकर सहादेव विश्वकर्मा (५६)रा सिंतासांवगी गंभीर जखमी असलेल्या कामगारांचे नाव आहे. जखमींवर भंडारा येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. मृतकाचे मृतदेह (Dead Body)शवविच्छेदनासाठी(Autopsy) तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी व माॅयल खाण परिसरात पोलीसा़चा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सदर स्लॅबच्या मलब्याखाली आणखी किती कामगार दबले आहेत ? या़ची शोध मोहीम माॅयल प्रशासनाने सुरू केली आहे.व बचाव कार्य सुरू केले आहे. मात्र वृत्त लिहोस्तर सदर घटनेत कामगारांचा मृत्यूचा व जखमीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चिखला माॅयल भुमीगत खाणीत झालेल्या घनटेने भंडारा येथिल आयुध निर्माण कंपनीतील पुनरावृत्ती झाली आहे. व येथिल आठवणी ताज्या झाल्या आहेत. सदर घटना येथिल चिखला मायल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना स्थानिक नागरीकांकडुन बोलले जात आहे.