बदलापूर:– राज्यात धुळवडीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक धुळवड साजरी करत आहेत. बदलापुरातही धुळवड सणाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र धुळवडीदरम्यान गालबोट लागणारी घटना घडली आहे. बदलापुरात धुळवडीदरम्यान दुर्देवी घटना घडली आहे. बदलापुरातील उल्हास नदीत बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
बदलापुरात धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला गेलेल्या मुलांसोबत धक्कादायक घटना घडली आहे. बदलापुरात धुळवडीदरम्यान उल्हास नदीत बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला आहे. बदलापूरच्या चामटोली परिसरात राहणारे चौघे मुले होते. चारही मुले चामटोली जवळील पोद्दार गृह संकुलात राहणारे होते. चौघांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
बदलापूरच्या चामटोली भागात राहणाऱ्या चौघांनी धुळवड खेळली. धुळवड खेळल्यानंतर रंग काढण्यासाठी उल्हास नदीजवळ पोहोचले. उल्हास नदीत चौघे अल्पवयीन मुले उतरले. या चौघांना पाण्याचा अंदाज आला. त्यामुळे चौघे अल्पवयीन मुले पाण्यात बुडाले. चामटोली राहणाऱ्या चौघांचा बुडून मृत्यू झाला. चौघांच्या मृत्यूने चामटोली परिसरात खळबळ उडाली आहे. चौघे पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि स्थानिकांनी तातडीने चौघांचे मृतदेह बाहेर काढले. चौघांच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे. चौघांच्या मृत्यूने धुळवड सणाला गालबोट लागलं आहे.