32.5 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home Top News मध्यप्रदेशात जबलपूरमध्ये नर्मदा नदीवरील बरगी धरणात क्रूझ बुडाले; ९ जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशात जबलपूरमध्ये नर्मदा नदीवरील बरगी धरणात क्रूझ बुडाले; ९ जणांचा मृत्यू

0
40

आईने शेवटच्या श्वासापर्यंत चिमुकल्याला छातीशी कवटाळून ठेवले

नर्मदा क्रुझ दुर्घटनेचे ते ह्रदयद्रावक दृश्य पाहून साऱ्यांचे डोळे पाणावले

भोपाळ:-मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये नर्मदा नदीवर असलेल्या बरगी धरणात गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. एमपी टूरिझमचा पर्यटकांनी भरगच्च भरलेली बोट पाण्यात बुडाली. या भीषण अपघाताचं भायवह दृष्य समोर आलं आहे. आई आणि तिच्या तीन वर्षांच्या बाळाचं मन हेलावून टाकणारं दृष्य पाहून अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. अपघाताचे धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या अपघातात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. बचावकार्य अजूनही अविरतपणे सुरू आहे.

बचाव पथकांनी एका महिलेचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा सर्वात थरारक आणि मन हेलावून टाकणारे दृश्य समोर आले. महिलेच्या मृतदेहाशेजारीच तिचं जवळपास तीन वर्षांचे बाळ सापडलं. या बाळाने ‘लाईफ जॅकेट’परिधान केले होते आणि ते आईच्या गळ्याला घट्ट बिलगून होते. हे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी संध्याकाळी 29 प्रवासी आणि दोन कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी एक ‘क्रूझ बोट’अचानक आलेल्या जोरदार वादळामुळे उलटली. सोसाट्याचा वारा आणि उंच लाटांमुळे बोटीचा तोल गेला.प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की,प्रवाशांनी कर्मचाऱ्यांकडे बोटीला किनाऱ्याच्या दिशेने नेण्याची विनंती केली होती. परंतु कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हा भीषण अपघात घडला. पर्यटन मंत्री धर्मेंद्र भाव सिंह लोधी यांनी म्हटलंय की, सुरुवातीला चार मृतदेह सापडले होते. मात्र त्यानंतर आणखी पाच मृतदेह हाती लागल्याने मृतांचा आकडा नऊवर पोहोचला आहे. अद्यापही बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथके सक्रियपणे कार्यरत आहेत.

blank