चेन्नईला वरदा वादळाचा तडाखा

0
12

चेन्नई दि 12 : वरदा चक्रीवादळ चेन्नईला धडकलं आहे. 110/120 प्रती तास वेगाने हे वादळ पुढे सरकत असून, चेन्नईसह आंध्र प्रदेशातही वादळी वाऱ्यासह पाऊल कोसळत आहे. वरदा चक्रीवादळामुळे 2 मृत्यू झाला असून, चेन्नईच्या अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे.चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकले असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत राहील असे हवामान विभागाने सांगितले.तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळून 7 हजार आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी भागातून 9 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. नौदलाची दोन जहाचे डॉक्टर, अन्न आणि पाण्यासह सज्ज आहेत. पाणबुडयांच्या 30 टीम्स सज्ज आहेत.हवाई दलाचा चेन्नई जवळचा तंबाराम तळही कुठल्याही आपत्तीच्या परिस्थितीत मदतीसाठी सज्ज आहे. किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या 15 टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. लष्कराच्याही सात तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.चेन्नईचा विमानतळ संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद करण्यात आला असून, उपनगरीय रेल्वे वाहतूकही स्थगित करण्यात आली आहे.