मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी उपक्रम राबविणार-प्रधान सचिव नंदकुमार

0
18

अदानी फाऊंडेशनच्यावतीने ४४ ई लर्निंग किटचे वितरण
गोंदिया,दि.१२:तिरोडा येथील अदानी पावर लि.च्या सभागृहात पूर्व प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणाला ई लर्निंगशी कसे जोडता येईल या विषयावर राज्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अदानी प्रकल्पाचे व्यवस्थापक सी.पी.साहू होते.या चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करताना प्रधान सचिव शालेय शिक्षण नंदकुमार म्हणाले की पूर्व प्राथमिक शिक्षण दर्जेदार झाल्यास प्राथमिक शाळेत येणाèया विद्याथ्र्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणार आहे.. याकरिता अंगणवाडी सेविकासोबतच प्राथमिक शाळांचे शिक्षक देखील अंगणवाडीतील मुलांना शिकविणार आहेत. तसेच अंगणवाडीमध्ये देखील दृकश्राव्य माध्यमाचा उपयोग केला जाणार आहे.एकविसावे शतक ज्ञान व तंत्रज्ञानाचे असून या शतकात प्रत्येक मुल शिकेल. याकरिता रचनावादी पद्धतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. पुढे बोलताना त्यांनी शिक्षण विभागातर्फे आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण करण्याच्या कार्यामध्ये अदानी फाउंडेशन द्वारे शिक्षण विभागाच्या अधिकारी व कर्मचाèयांच्या प्रशिक्षणासाठी नि:शुल्क प्रशिक्षण व निवास व्यवस्था अदानी पावर तिरोडा येथे उपलब्ध केल्याबद्दल त्यांनी अदानी फाउंडेशनचे आभार मानले. सदर चर्चासत्राचे औचित्य साधून प्रधान सचिवाच्या हस्ते ४४ जि.प.उच्च प्राथमिक शाळांना ई-लर्निंग किट्सचे वितरण अदानी फाउंडेशनकडून करण्यात आले.कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी उल्हास नरड,महिला बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एम.अंबादे,प्रशांत डबरे,सुनिल मांढरे,श्रीमती काळे,नितिन शिराळकर यांच्यासह तालुक्यातील शिक्षक,अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
कार्यक़्रमाचे अध्यक्ष सी.पी. साहू यांनी नंदकुमारासारखे शिक्षणाधिकारी तळमळ असणारे प्रधान सचिव महाराष्ट्राला लाभले हे आपले भाग्य असल्याचे विचार व्यक्त केले. अदानी फाउंडेशन शिक्षण विभागाच्या या स्तुत्या व क्रांतीकारी उपक्रमास नेहमी सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. तसेच प्रधान सचिवांनी ई-लर्निंग किटचे लोकार्पण केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.