मुंबई,दि. 15 – घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर येथे ही दुर्घटना आहे. यात काही जण जखमी झाल्याची माहिती असून ढिगा-याखाली अडकलेल्या 12 जणांना सुखरुप वाचवण्यात आले आहे. दरम्यान, ढिगा-याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जखमींवर शताब्दी, राजावाडी अशा विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.