गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे वाहन चढले दुभाजकावर

0
10

गोंदिया,दि.14-गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षकांकरीत असलेले चारचाकी वाहन आज सायकांळला 8 ते 9 वाजेच्या दरम्यान मुर्री कडून बाजपेयी चौकाकडे येणार्या रस्त्यावरील दुभाजकावर रात्री्च्यावेळी चढल्याची घटना घडली.यावेळी कुठलीही अनुचित घटना मात्र घडली नाही.त्या मार्गावरील रस्ता हा मोठा असताना आणि पुरेशा विजपुरवठा रस्त्यावर असताना ठाणेदाराच्या वाहनचालकाला ते दुभाजक कसे दिसले नाही अशा प्रश्न उपस्थित झाला आहे.वाहनचालक नशेत तर नव्हता ना अशा चर्चा घटनास्थली होत्या तर काहींच्या मते वाहनचालक हा म्हातारा होता असे म्हणने होते.वाहनचालक हे जर म्हातारे होते व रात्रीच्यावेळी वाहनचालवू शकत नसल्यास पोलीसप्रशानाने त्यांच्या हाती रात्रीला वाहन कसे सोपविले हा सुध्दा प्रश्न उपस्थित झाला आहे.त्यावाहनाचे क्रमांक एमएच 35 ,डी.370 असे असून वाहनचालकासह गाडीतील दोन पोलीस कर्मचारी हे याअपघातात जखमी झाले आहेत.हा अपघात होताच मुर्री रोड परिसरातील नागरिकांची घटनास्थळी एकच गर्दी झाली होती.