आसाराम बापूविरुद्ध बलात्काराची तक्रार करणारी महिला बेपत्ता

0
6

स्वयंघोषीत गुरु आसाराम बापू याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करणारी महिला गेली एक आठवड्यापासून बेपत्ता आहे.
सुरत- स्वयंघोषीत गुरु आसाराम बापू याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करणारी महिला गेली एक आठवड्यापासून बेपत्ता आहे. ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार एक आठवड्यापूर्वी सुरतमधील कामरेज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या महिलेला पोलिस संरक्षण देण्यात आले होते. मात्र अमरोली येथील एका समारंभाला जाण्यापूर्वी या महिलेने संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांना परत जाण्यास सांगितले होते.
ही महिला बेपत्ता होण्याच्या काही दिवस आधी तिच्या मोठ्या बहिणीने आसारामविरुद्ध न्यायालयात दिलेला जबाब बदलण्याची परवानगी मागितली होती. मात्र न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली. कलम १६४ नुसार एखाद्याने दिलेला जबाब पुन्हा कोणत्याही परिस्थीतीत बदलात येणार नाही असे न्यायालाने म्हटले होते.
आपला नवरा आणि मुलासोबत ही महिला १४ डिसेंबर रोजी अमरोली जाणार होती. तिने संरक्षणासाठी दिलेल्या चार पोलिसांना १७ डिसेंबर रोजी परत येणार असल्याचे सांगितले होते. या चारही पोलिसांनी वरिष्ठ अधिका-यांची परवानगी न घेता संबंधीत महिलेला जाऊ दिले.
मात्र १७ डिसेंबरनंतरही ही महिला घरी आली नाही. तसेच तिचा मोबाईल फोनही बंद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर संरक्षणासाठी तैनात असलेल्या चार पोलिसांनी वरिष्ठ अधिका-यांना याची माहिती दिली. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी महिलेचा शोध सुरु केला. मात्र ती अद्याप सापडलेली नाही.
ही महिला जेव्हा कामरेज येथे राहत होती तेव्हा तिची मोठी बहीण नेहीम पोलिस संरक्षण घेण्यास नकार देत होती असे पोलिस निरीक्षक एल.डी. वाघडिया यांनी सांगितले. मात्र तिला संरक्षण देणे ही आमची जबाबदारी असल्याचे वाघडिया यांनी स्पष्ट केले. अमरोली येथे जाणाता या महिलेची ओळख पटू नये म्हणून तीने पोलिस संरक्षण नाकारल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक सौराष्ट्राला रवाना झाले आहे. ही महिला पूर्वी सौराष्ट्रामध्ये राहत होती. बेपत्ता होण्याच्या काही आधी महिलेच्या मुलाने सुद्धा शाळेतून सुट्टी घेतल्याचे वाघडिया म्हणाले.