तिल्ली मोहगावच्या जंगलात अंधश्रद्धेतून अस्वलाची शिकार

0
16

गोंदिया,berartimes.com,दि. 14 – जिल्ह्यातील गोरेगाव वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या तिल्ली मोहगावच्या जंगल परिसरात अंधश्रद्धेतून विजेचा शॉक लावून अस्वलाची शिकार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.अस्वलासोबतच विजेच्या शॉकमुळे एका गायीचा सुद्धा मृत्यू झाला असून पुरावे नष्ट करण्यासाठी गावाजवळीलच एका शेतात अस्वलाचे अवयव काढून अस्वल आणि गायीला जाळण्याचा प्रकार आरोपीने केला.या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाèयांनी घटनास्थळ गाठून परिसराचा पंचनामा करून जाळण्यात आलेल्या जनावरांचे शवविच्छेदन केले.या घटनेनंतर आजही गावखेड्याक अंधश्रद्धा आणि जादुटोण्यावर लोकांचा विश्वास असल्याचे चित्र असून त्यापासून लोकांना दूर करण्यासाठी पाहिजे ती जनजागृती न झाल्यानेच निष्पाप प्राण्यांचा बळी चालला आहे.
आरोपीने अस्वलाची शिकार करून अस्वलाचे काळीज,qलग,नख आणि इतर अवयव काढून नेल्याचे शवविच्छेदनात समोर आले आहे.अस्वलाकरीता लावलेल्या विजेच्या तारांच्या जाळ्यात गाय अडकल्याने तिचा मृत्यू झाल्याने आरोपीने गायीला सुद्धा जाळले.परंतु गाय पूर्णतः न जळाल्याने त्याने शेतातीलच एकाच्या विहिरीत गायीचा अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर फेकून दिले होते.गावातीलच काहींना घटनेची माहिती मिळाल्याने त्यांनी वनविभागाच्या अधिकाèयांना घटनेची माहिती दिली.त्यानंतर वनविभागाने संशयित आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली असून अद्यापही त्या संशयित आरोपी ताब्यात येईपर्यंत काहीही बोलणार नसल्याचे वनअधिकारी यांनी म्हटले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकत्र्यांच्या मते जंगल परिसरात राहणाèया आदिवासी लोकांमध्ये जादू टोण्या कायद्यात विषयी जनजागृती नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोक अपत्यप्राप्तीसाठी अस्वलाचा qलग महिलेला खाऊ घातल्याने बाळ जन्माला येतो.र अस्वलाच्या केसांचा ताबीज घातल्याने दृष्ट लागत नाही. अस्वलाच्या नखांचा ताबीज घातल्याने काळ्या जादूचा असर मानवी जिवावर होत नाही अशी धारणा करून बसले आहेत.त्यामुळे आजही काही आदिवासीसह इतर लोक वाघ ,घुबड ,अस्वलसारख्या दुर्मिळ वन्यप्राण्यांची शिकार करत असल्याचे बोलले जात आहे.