28.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home राष्ट्रीय देश पनीरसेल्वम यांची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी, पलनीस्वामी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

पनीरसेल्वम यांची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी, पलनीस्वामी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

0
28

चेन्नई, दि. 14 – तामिळनाडूमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात शशिकला यांना न्यायालयाने चारवर्षांची शिक्षा सुनावताच मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. शशिकला यांच्या मर्जीतील ई. पलनीस्वामी यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
पनीरसेल्वम यांचे पक्षातील प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचे अण्णाद्रमुकच्या अधिकृत टि्वटर अकाऊंटवर म्हटले आहे. विधिमंडळ नेतेपदी निवडण्यात आलेले पलनीसमी सध्याच्या सरकारमध्ये बांधकाममंत्री आहेत. शशिकलांशी निष्ठावंत असणा-या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते.