प्रवाशांनी वर्धेत रोखली विदर्भ एक्सप्रेस

0
13

वर्धा- रेल्वे प्रशासनाच्या जाचाला कंटाळून वर्धा येथे रेल्वे प्रवाशांनी अखेर विदर्भ एक्सप्रेस रोखून धरली. मासिक पासधारकांनवर होत असलेल्या कारवाईचा निषेध करीत प्रवाशांना बसण्याची सोय करण्याची मागणीचा येथे उद्रेक बघावयास मिळाला.
सविस्तर असे की, गेल्या महिनाभरापासून रेल्वेचे कर्मचारी हे मासिकपास धारकांविरुद्ध आरक्षित डब्यात बसल्यावरून दंडाची कारवाई करीत होते. ही कारवाई करीत असताना अनेकदा रेल्वे कर्मचारी हे प्रवाशांना अपमानास्पद वागणून देत असल्याच्या तक्रारीत सातत्याने वाढ होत होती. बडनेरा,धामणगाव,पुलंगाव,वर्धा येथून हजारो लोक करतात दररोज रेल्वेच्या मासिक पासने प्रवाश करीत असतात. आज या सर्व प्रवाश्यांनी सामान्य बोगीतून प्रवास करण्यासाठी वर्धेच्या स्थानकात गर्दी केली. मात्र. वर्धा स्थानकावर विदर्भ एक्सप्रेस पोचताच आधीच सामान्य बोगी हाऊस फुल्ल होती. त्यामुळे त्या डब्यात पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती. यामुळे सर्व प्रवाश्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे डब्यात बसण्याची सोय करून देण्याची मागणी केली. या मागणीमुळे रेल्वे अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली. प्रशासनाची हतबलता बघून अखेर प्रवाश्यांनी विदर्भ एक्सप्रेसच्या इंजिनसमोर उभे राहत रेल्वे रोखून धरली. वृत्त लिहीपर्यंत सुमारे 40 मिनिटे गाडी वर्धा येथे थांबून होती.