सामूहिक बलात्कार प्रकरणी माजी मंत्री गायत्री प्रजापती अखेर अटक

0
9

लखनऊ, दि. 15 – उत्तरप्रदेशच्या माजी अखिलेश सरकारमधील मंत्री आणि सामूहिक बलात्काराचे आरोपी गायत्री प्रजापती यांना अखेर अटक करण्यात आली आहे. त्यांना आलमबाग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला होता. पण 27 फेब्रुवारीपासून गायत्री प्रजापती फरार होते. पोलीस त्यांचा शोध घेत होती, मात्र त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. मंगळवारीच वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी 24 तासात त्यांना अटक करु असं आश्वासन दिलं होतं. गायत्री प्रजापतींचा अटक करण्यासाठी पोलिसांनी आपली सहा पथकं कामाला लावली होती.