बिरसी विमानतळावरील प्रशिक्षणार्थी विमान कोसळले,दोन पायलट ठार

0
8

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.२६-berartimes.com-गोंदिया येथील बिरसी विमानतळावरील राजीव गांधी विमान प्रशिक्षण केंद्रातील एका प्रशिक्षणार्थी विमानाला आज बुधवारला सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास अपघात होऊन दोन पायलट जागीच ठार झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत घडली.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षणार्थी वैमानिक आपल्या वरिष्ट पायलटसोबत प्रशिक्षणार्थी विमानाने विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर गोंदियापासून पश्चिमेला असलेल्या देवरी गावाजवळून वाहणाèया वैनगंगा नदीच्या मधल्या पात्रात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले.विमान कोसळल्याचे लक्षात येताच आजुबाजूच्या नागरिकांनी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. हे विमान ४ आसनी होते.
अचानक विमानात बिघाड आल्याचे पायलटच्या लक्षात आले.सावधगिरी बाळगत ते विमान उतरविण्याच्या प्रयत्न करीत असतानाच देवरी ते मध्यप्रदेशातील लावणी या गावी जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रोपवेच्या ताराला हे विमान अडकले.त्यानंतर तो विमान नदीत असलेल्या डोंग्याला आढळल्याने हा अपघात घडला.मृत पायलटमध्ये वरिष्ट पायलट रंजन आर गुप्ता(वय ४५) यांचा समावेश असून प्रशिक्षणार्थी पायलट ही कु.हिमानी गुरुदयाल सिंग कल्याण (वय २४)चा समावेश आहे.
आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाचे प्रबधंक राजा रेड्डी,अप्पर तहसिलदार एन.एस.मेश्राम,बालाघाट जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक व उपविभागीय अधिकाèयांनी घटनास्थळावर धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.अपघातात पुर्णत मोडकळील आलेल्या प्रशिक्षणार्थी विमानाच्या ब्ॅलकबाँक्स च्या तपासणीनंतरच विमानात बिघाड आला होता की नाही याचा उलगडा होणार आहे.