गडकरी, पटेलांच्या नार्को चाचणीसाठी बीडला उपाेषण

0
11

बीड – भारतीय जनता पक्षाचे दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हा घातपात असल्याचा आरोप करत नगर येथील माजी सरपंचासह दोघांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

महाराष्ट्राचे लोकनेते तथा दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करत नगर येथील माजी सरपंच सूर्यभान गिते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून उपोषण सुरू केले. गिते यांनी निवेदनात म्हटले की, कुटिल डाव रचून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा अपघात घडवला आहे. याप्रकरणी
उच्चस्तरीय समिती नेमून अपघात की घातपात आहे हे चौकशी करून स्पष्ट करावेत. शासनाने या प्रकरणाशी संबंधित एम्स हॉस्पिटलचे डॉ. अमित गुप्ता, डॉ. सुधीर गुप्ता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री हर्षवर्धन, पी. एल. नायर, माजी आमदार पाशा पटेल, चालक करतारसिंग यांची नार्को चाचणी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी सूर्यभान गिते यांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.