बस्तर येथे दहा माओवाद्यांचे आत्मसमर्पण

0
12

रायपूर(बस्तर)दि.23 : नक्षल्यांच्या चळवळीला त्रासून तसेच विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या उद्देशाने दरभा डिव्हीजनच्या दहा कट्टर माओवाद्यांनी बस्तर येथे २२ सप्टेंबर रोजी बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा, दंतेवाडा हद्दीचे पोलीस उपमहानिरीक्षक सुंदरराज पी, जिल्हाधिकारी धनंजय देवांगण, पोलीस अधीक्षक आरिफ शेख यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. नक्षल्यांच्या आत्मसमर्पणामुळे माओवाद्यांच्या चळवळीला हादरा बसला असून सदर माओवादी विकासाच्या मुख्या प्रवाहात सामील झाले आहेत.
आत्मसमर्पण करणार्या माओवाद्यांमध्ये दरभा डिव्हीजन कमेटी अंतर्गत २ जनमिलिशिया सदस्य, जीरम गावचा १ जनमिलिशिया सदस्य, १ जनताना सरकार सदस्य, कलेपाल गावचा १ जनमिलिशिया सदस्य, १ सीएनएम सदस्य, गाव कुडूमखोदराचे ४ जनमिलिशिया सदस्य तथा मारडूम क्षेत्रांतर्गत येत असलेल्या धर्माबेडा गावचा १ जनमिलिशिया सदस्य असे एकूण १० नक्षली सदस्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये लखमू मौर्य (३६), देऊ नाग (२७), लखमा कवासी (३१), देवू (३२), फगनू मडकामी (२५), बामन पोडियामी (१९), लच्दू मरकाम (३९), गुड्डी कश्यप् (४७), कमलू मरकाम (३७) भगचंद उर्फ खुटी (३२) असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची नावे आहेत.  सदर आत्मसमर्पित नक्षली २०१४ – १५ मध्ये नक्षल चळवळीत सामील झाले होते. सदर नक्षली गावातच राहून नक्षल्यांना भोजनाची व्यवस्था करणे, बैठका बोलाविणे, गाववासियांना नक्षल्यांसमोर आणणे तथा माओवाद्यांना क्षेत्रातील रस्त्याबाबत मार्गदर्शन करणे, पोलीसांची माहिती देणे आदीमध्ये त्यांचा सहभाग होता.