अंगणवाडी सेविकांनी तुटपुंजी वाढ नाकारली,कृती समिती आंदोलनावर ठाम

0
10

मुंबई,दि.23 : अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपामुळे राज्य सरकारने त्यांच्या मानधनात शुक्रवारी १५०० रुपयांची वाढ केली असली, तरी ती अपुरी असल्याचे सांगत, संप कायम ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतल्याची माहिती एम.ए.पाटील,शुभा शमीम,दिलीप उठाणे,भगवानराव देशमुख,कमल परुळेकर,सुवर्णा तळेकर व जयश्री पाटील यांनी दिली.तसेच 27 सप्टेंबरच्या मुंबई येथे आयोजित सभेत ताकदिनीसी सहभागी व्हावे असे आवाहनही केले आहे.सरकारने संघटनेत फुट पाडण्याचा प्रयत्न केला असला तरी तो हाणून पाडू असे म्हटले गेले आहे.
अंगणवाडी कर्मचा-यांचे मानधन तीन हजार रुपयांनी वाढवावे, या मागणीसाठी सेविकांनी ११ सप्टेंबरपासून संप पुकारला आहे. त्याची दखल घेत, अंगणवाडी मदतनिसांचे मानधन २५०० रुपयांवरून ३ हजार ५०० रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ३ हजार २५० रुपयांवरून ४ हजार ५०० रुपये करण्यात आल्याचे महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. या मानधानवाढीनंतर २५ टक्के अंगणवाडी सेविका कामावर रूजू झाल्याचा दावाही पंकजा मुंडे यांनी केला.