24.5 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home Top News जमाकूडोत मलेरियाने मूलीचा मृत्यू

जमाकूडोत मलेरियाने मूलीचा मृत्यू

0
22

गोंदिया,दि.13ः- आदिवासी नक्षलग्रस्त तालुका असलेल्या सालेकसा तालुक्यातील जमाकुडो प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत एका सहावर्षीय बालीकेचा मृत्यू मलेरियाने झाल्याची घटना आज उघडकीस आली.मृत मुलीचे नाव खुशी अशोक खांडवाये असल्याची माहिती सुत्रांनी दिली.तसेच सदर मुलीला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आणले असता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची पुष्ठी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.श्याम निमगडे यांनी केली आहे.