नक्षल्यांनी केली घोडेझरीच्या इसमाची गळा चिरून हत्या

0
27

गडचिरोली, ता.६-धानोरा तालुक्यातील गट्टा फुलबोडी पोलिस मदत केंद्रांतर्गत घोडेझरी येथील एका इसमाची नक्षल्यांनी काल (ता.५) रात्री गळा चिरून हत्या केली. इंदरशहा केसू परसा (५०) असे मृत इसमाचे नाव आहे.
काल रात्री १५ ते २० सशस्त्र नक्षली घोडेझरी येथे गेले. त्यांनी इंदरशहाला झोपेतून उठवून गावाबाहेर नेऊन त्याची हत्या केली. हे कृत्य चातगाव दलमच्या नक्षल्यांनी केल्याचा अंदाज आहे. या भागात अलिकडच्या काळात नक्षल कारवाया वाढल्या आहेत. १५ दिवसांपूर्वी याच परिसरातील पुस्टोला-गरंजी मार्गावर नक्षल्यांनी एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकीची १५ वाहने जाळली होती. आता नक्षल्यांनी पोलिस खब-या असल्याच्या संशयावरून नागरिकांची हत्या करणे सुरू केल्याने या भागात दहशत पसरली आहे.