उद्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार दानवे !

0
13

मुंबई: गुरुवारी केंद्रीय मंत्रिपदाचा भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे राजीनामा देणार असून महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी दानवे यांची निवड झाल्याने, ते मंत्रिपदाचा त्याग करणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात दानवे हे ग्राहक संरक्षण, अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत.

भारतीय जनता पार्टीत ‘एक व्यक्ती, एक पद’ असा नियम असल्याने मी उद्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदार संघातून दानवे चौथ्यांदा निवडून आले. त्यानंतर त्यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली. मात्र लोकसभा निवडणुकानंतर महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना सरकार सत्तेत आल्यामुळे त्यावेळी प्रदेशाध्यक्ष असलेले देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्याने, भाजप प्रदेशाध्यक्षपद रिकामें झाले होते. जानेवारी २०१५ मध्ये या जागी रावसाहेब दानवेंची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे आता दानवेंकडे भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आणि केंद्रातील मंत्रिपद अशी दोन पदे आहेत.