‘हिट अँड रन’ खटला: सलमान खान दोषी

0
13

वृत्तसंस्था
मुंबई दि. 6: गेली 13 वर्षे सुरू असलेल्या ‘हिट अँड रन‘ खटल्यात अभिनेता सलमान खान याला न्यायालयाने आज (बुधवार) दोषी ठरविले. 2002 मध्ये मद्यधुंद अवस्थेत सलमान गाडी चालवत होता, हा सरकारी पक्षाचा दावा न्यायालयाने मान्य केला.
न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सलमानला आज सकाळी 11.15 वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. 13 वर्षांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत सलमान खानने केलेल्या अपघातामध्ये एक ठार आणि पाच गंभीर जखमी झाले होते, असा आरोप सरकारी पक्षाने केला होता. तो सिद्ध करण्यासाठी 27 साक्षीदारांचा जबाबही नोंदविला होता. सलमानने या आरोपांचे खंडन केले असून त्या दिवशी दारू प्यायलो नव्हतो आणि गाडीही चालवत नव्हतो, असा दावा केला आहे. अपघाताच्या दिवशी आपला वाहनचालकच गाडी चालवत होता, असा दावाही सलमानने केला होता. त्याचा चालक अशोकसिंह यानेही स्वत: गाडी चालवत असल्याची कबुली काही दिवसांपूर्वी दिली होती. सलमान खानचे सर्व दावे फेटाळत न्यायालयाने त्याला सर्व आरोपांखाली दोषी ठरविले.