गोंदिया,दि.२४ः- नागपूरात मृतावस्थेत आढळलेल्या जस्टीस लोया प्रकरणात अनेकांनी आपल्याकडे माहिती आहे,ती आम्ही आपणास देऊ असे संपर्क करीत सांगितले होते.परंतु संपर्क केलेल्यापैकी कुणीही आपल्याकडे कुठलेच कागदपत्रे qकवा तक्रार घेऊन न आल्याने याप्रकरणात कुठल्याच चौकशीचा प्रश्न उदभवत नसल्याचे राज्याचे गृहमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.सोबतच भीमा कोरेगाव प्रकरणाची सखोल चौकशी सुरु करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तसेच गृहराज्यमंत्र्यासोबत आढावा घेण्यात आला असून याप्रकरणात झालेल्या सर्व कारवाईचा सखोल तपास करण्याचे निर्देश पोलीस विभागाला देण्यात आले असून चौकशीनंतरच याप्रकरणात एसआयटी गठित करायची की नाही ठरविले जाणार असल्याचेही सांगितले.
ते गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते.पत्रपरिषदेला आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे,आमदार सहसराम कोरेटे,जिल्हाधिकारी डॉŸ.कादबंरी बलकवडे,पोलीस अधिक्षक मंगेश qशदे उपस्थित होते.गृहमंत्री देशमुख म्हणाले की आम्हाला राज्यातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करायचे आहे.सोबतच उपराजधानीला जो क्राईम कॅपिटल म्हणून संबधोले जाऊ लागले ते डाग पुसून काढायचे आहे.आधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्याकडेच गृहमंत्रालयाचा प्रभार राहिल्याने बहुतेक त्यांना याकडे लक्ष देता आले नसावे असे सांगत राज्यातील औरगांबाद,नाशिक व नागपूर अनुक्रमे पहिल्या तीनमध्ये गुुन्ह्यात आघाडीवर असल्याचा अहवाल आलेला आहे.गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असून या जिल्ह्यातील सुरक्षेवर सुद्दा लक्ष केंद्रीत केले जाणार असून या जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेली भारत बटालियन याच जिल्ह्यात राहणार यासाठी लवकरच आढावा घेणार असल्याचे सांगत प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचेही सांगितले.सोबतच सीएए,एनआरसीच्या मुद्यावर आजपर्यंत १२०० च्यावर मोेर्चे निघाले असून पोलिसांनी त्या सर्व मोच्र्यांना व्यवस्थित हाताळले आहे.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची दिल्लीतील काढलेली सुरक्षा हे राजकीय वैर असून पवार साहेब हे माजी सरक्षणंमत्री,कृषीमंत्रीसह मुख्यमंत्री राहिलेले असून त्यांची सुरक्षा काढतांना या बाबींचा विचार करायला पाहिजे होता परंतु राजकीय द्वेष ठेवून सुरक्षा व्यवस्था काढण्यात आल्याची टिका केली.सोबतच फोन टॅqपग प्रकरणात चौकशी सुरु असून विधानसभा निवडणुकीत तत्कालीन सरकारने काँग्रेस,राँका,शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचे समोर आल्याने चौकशी करण्यात येणार आहे.यावरच तत्कालीन गृहराज्यमंत्री केसरकर यांनी फोनटॅqपग एवढा महत्वाचा मुद्दा नसल्याचे म्हटले त्यावर विचारले असता त्यांनी काय बोलले हे आपण बघितले नाही त्यामुळे त्यावर बोलण्यास नकार दिला.गोंदिया जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून पेंडीग असलेल्या ५०० कोटी रुपयाच्या तांदुळ उचलप्रकरणात अन्नपुरवठा मंत्री यांच्याशी चर्चा संबधिताविरुध्द न्यायालयात चांगले वकील लावून कारवाई करण्यासंदर्भात येत्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचे सांगितले.गोंदिया जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात १० कोटी रुपयाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे आमदार रहागंडाले यांच्या तक्रारीचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.





