गेवराईचे माजी आमदार माधवराव पवार कालवश

0
23

बीड दि.20:: गेवराई विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माधवराव शिवाजीराव पवार (वय 76) यांचे मंगळवार- बुधवारच्या मध्यरात्री निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
1980 च्या दरम्यान माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचा पराभव करुन ते गेवराई मतदार संघातून निवडून आले होते. गेवराईचे आमदार ऍड. लक्ष्मण पवार यांचे ते वडिल होत.