राज्यसभेसाठी दीड तासांत 50 टक्के मतदान पूर्ण, गंभीर आजारी भाजप आमदार रुग्णवाहिकेतून मुंंबईकडे रवाना

0
56

मुंबई,दि.10ः आज सकाळी 9 वाजेपासून राज्यसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिड तासात 143 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपच्या 60 हून अधिक आमदारांनी मतदान केले असून काँग्रेसच्याही जवळपास 20 आमदारांनी मतदान केले आहे. पावणे अकरावाजेपर्यंत जवळपास 50 टक्के मतदान पूर्ण झाले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत मतदान पूर्ण होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे आमदार ट्रायडेंट हॉटेलमधून विधानभवनात दाखल झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही लवकरच विधानभवनात दाखल होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही विधानभवनात दाखल झाले असून लवकरच ते मतदान करणार आहेत.

आमदार रुग्णवाहिकेतून मुंबईकडे रवाना

पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार गंभीर आजारी असतानाही राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी बाहेर पडले आहेत. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे काही महिन्यांपासून गंभीर आजाराने त्रस्त असून त्यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र, राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रत्येक आमदाराचे मतदान महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे लक्ष्मण जगताप यांना मतदानासाठी मुंबईत येण्याची विनंती पक्षातर्फे करण्यात आली होती. त्यावर आपली तब्येत ठिक असल्याचे सांगून लक्ष्मण जगताप हेदेखील आज सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

केंद्रीय मंत्री पियूष गोयल राज्यसभा निवडणुकीसाठी विधानभवनात दाखल झाले आहेत.
केंद्रीय मंत्री पियूष गोयल राज्यसभा निवडणुकीसाठी विधानभवनात दाखल झाले आहेत.

सायंकाळी 7 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार

आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत आमदारांना मतदान करता येणार आहे. त्यानंतर मतमोजणी होऊन सांयकाळी 7 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल. राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला पसंतीक्रम (1, 2, 3, 4, 5 आणि 6) दिला जातो. 42 किंवा अधिक सदस्यांनी उमेदवाराला प्रथम पसंती दिल्यास तो निवडून येतो. विधानसभेतील एकूण 288 सदस्यांपैकी शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन झाले असून अनिल देशमुख-नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी मिळाली नाही तर मविआला फटका बसण्याची शक्यता आहे.

असे आहे पक्षीय बालाबल

आघाडी + – १६७
शिवसेना – ५५
राष्ट्रवादी – ५१ (दोन सदस्य तुरुंगात)
काँग्रेस – ४४

अपक्ष – 
किशोर जोरगेवार (चंद्रपूर), गीता जैन (मीरा भाईंदर), नरेंद्र भोंडेकर (भंडारा), आशिष जयस्वाल (रामटेक), संजय शिंदे (करमाळा), चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), मंजुळा गावित (साक्री), विनोद अग्रवाल (गोंदिया), राजेंद्र यड्रावकर (शिरोळ).

छोटे पक्ष – ८
समाजवादी पार्टी – २, प्रहार जनशक्ती पार्टी – २, माकप – १, शेकाप – १, स्वाभिमानी पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पार्टी – १