ब्रम्हपुरी,दि.12- ब्रम्हपुरी-वडसा रोडवरील स्थानिक विद्यानिकेतन कॉन्वेंट नजीक आज रात्री 3 वाजेच्या सुमारास एका कारने झाडाला धडक दिल्याने भीषण अपझात घडला. यामध्ये 2 युवक जागीच ठार तर 3 जण गंभीर झाल्याची माहिती आहे.
मृतांमध्ये वडसा निवासी सन्नी संजय वाधवानी (वय24), शुभम कापगचे (वय 28) यांचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. यामध्ये सुमित मोटवानी( वय २७), सत्य आहूजा (वय २७) आणि जोशी(वय २७) यांचा समावेश आहे.