आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नौकरीची संधी 10 व 13 ला भरती मेळावा

0
45

 गोंदिया, दि. 07 : सुझुकी मोटर गुजरात  प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया येथे 13 ऑक्टोबर 2022 ला सकाळी 10 वाजता भरती मेळाव्याचे आयोजन केलेला आहे. त्याच तारखेला साक्षात्कार घेणार आहे.  वर्ष 2015 ते 2022 या दरम्यान फिटर, वेल्डर, ईलेक्ट्रिशियन, वायरमॅन, मशिनिष्ट, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक मोटर व्हेईकल, ड्राप्टसमॅन सिव्हील, ईत्यादी आयटीआय उत्तीर्ण झालेले उमेदवार या करीता पात्र आहेत.

          मागील दोन वर्षा पासून सुझुकी मोटार या जिल्हयात भरती आयोजित करत असून 250 हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना नौकऱ्या देण्यात आलेला आहेत. सदरील भरती मेळाव्यात जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे असे अंशकालीन प्राचार्य, तसेच सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्र द्वारा आवाहन करण्यात येत आहे.

10 तारखेला भरती मेळावा

             शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया येथे 10 ऑक्टोबर 2022 ला सकाळी 10 वाजता पुणे, औरंगाबाद तसेच गोंदिया येथील नामांकित कंपनी द्वारे गोंदिया जिल्हयातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील फिटर, वेल्डर, ईलेक्ट्रिशियन, वायरमॅन, मशिनिष्ट, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक मोटर व्हेईकल, ड्रापटसमॅन सिव्हील, ईत्यादी इंजिनिअरिंग व्यवसायातून आय. टी. आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भरती मेळावा घेण्यात येणार आहे. आयटीआय उत्तीर्ण झालेले (मुले- मुलींनी) उमेदवारांनी सदरील भरती मेळाव्यात जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे असे अंशकालीन प्राचार्य, तसेच सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया यांचे कडून आवाहन करण्यात येत आहे.