Home Uncategorized 30 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली:आरती सिंह आता बृहन्मुंबईत

30 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली:आरती सिंह आता बृहन्मुंबईत

0

मुबंई-राज्य सरकारने ३० वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मंगळवारी (१३ डिसेंबर) बदल्या केल्या आहेत. मुंबईचे सहपोलिस आयुक्त कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे -पाटील यांची पदोन्नतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. मीरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलिस आयुक्त सदानंद दाते यांची दहशतवाद विरोधी विभागाचे अपर पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था या पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

पदोन्नतीने बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे…

  1. सदानंत दाते (पोलिस आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार ते अप्पर महासंचालक, एटीएस, मुंबई
  2. विश्वास नांगरे पाटील (सह आयुक्त, बृहन्मुंबई ते अप्पर महासंचालक, अ‍ॅन्टी करप्शन, विनय कुमार चौबे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर
  3. मिलिंद भारंबे (आयजी, लॉ अ‍ॅन्ड ऑर्डर, महाराष्ट राज्य, मुंबई ते पोलिस आयुक्त, नवी मुंबई
  4. राज वर्धन (सह आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई ते अप्पर महासंचालक, नि-सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई
  5. विनयकुमार चौबे (अप्पर महासंचालक, अ‍ॅन्टी करप्शन, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
  6. अमिताभ गुप्ता (पोलिस आयुक्त, पुणे शहर ते अप्पर महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट राज्य, मुंबई
  7. निकेत कौशिक (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते अप्पर महासंचालक, अ‍ॅन्टी करप्शन, महाराष्ट्र राज्य, मुंबई. प्रभात कुमार यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर
  8. शिरीष जैन (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
  9. संजय मोहिते (विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई ते विशेष महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयात
  10. नवीनचंद्र रेड्डी (अप्पर आयुक्त, नागपूर शहर ते पोलिस आयुक्त, अमरावती शहर
  11. आरती सिंह (पोलिस आयुक्त, अमरावती शहर ते अप्पर आयुक्त, सशस्त्र पोलिस, बृहन्मुंबई
  12. नामदेव चव्हाण (अप्पर आयुक्त, पुणे शहर ते उप महानिरीक्षक, सीआयडी, पुणे
  13. निसार तांबोळी (उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड ते अप्पर आयुक्त, वाहतूक, बृहमुंबई
  14. ज्ञानेश्वर चव्हाण (अप्पर आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई ते अप्प्र आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई
  15. ​​​​​​​रंजन कुमार शर्मा (उप महानिरीक्षक, सीआयडी ते अप्पर आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई
  16. विनित अगरवाल, बिपिन कुमार सिंह, देवेन भारती, प्रभात कुमार आणि महेश पाटील यांची बदली करण्यात येत असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

Exit mobile version