Home विदर्भ सहा.गटविकास अधिकार्यांना कधी मिळणार बीडीओंचा प्रभार

सहा.गटविकास अधिकार्यांना कधी मिळणार बीडीओंचा प्रभार

0

गोंदिया,दि.13ः- गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समितीमध्ये रिक्त असलेल्या सहाय्यक गटविकास अधिकारी पदांची भऱती पदोन्नतीतून राज्यसरकारच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने 16 नोव्हेबंरला केल्या.त्यामध्ये सडक अर्जुुनी,गोंदिया,गोरेगाव,आमगाव य़ा पंचायत समित्यांचा समावेश आहे.राज्यसरकारच्या 30 आक्टोंबर 2014 च्या शासन निर्णायनुसार ज्या पंचायत समितीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी हे पद भरले असेल आणि त्याच पंचायत समितीमध्ये जर गटविकास अधिकारी(बीडीओ)चे पद रिक्त असेल तर त्या पदाचा प्रभार सहाय्यक गटविकास अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वरीत सोपवावा असा आदेशच तत्कालीन प्रधान सचिव व्ही गिरिराज यांनी काढलेला होता.त्यातच सहाय्यक गटविकास अधिकार्यास पदभार द्यावयाचा नसेल इतर अधिकारी नियुक्त करावयाचा असल्यास विभागीय आयुक्तांची परवानगी घेण्यात यावे असेही म्हटले आहे.आजच्या घडीला गोंदिया व सडक अर्जुनी पंचायत समितीमध्ये बीडीओंचे पद रिक्त असून त्याठिकाणी सहाय्यक गटविकास अधिकारी कर्त्यव्यावर असतानाही त्यांना प्रभार देण्यास जिल्हा परिषदेचा सामान्य प्रशासन विभाग का टाळाटाळ करतोय हा प्रश्न निर्माण झालेला आहे.

Exit mobile version