
तिरोडा- गोंदिया जिल्ह्यात ९० टक्के शेतकरी भाताची शेती करीत असून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करीत असतात.याकरिता शेतकऱ्यांना त्या हंगामाची ई पिक नोंदणी होणे गरजेचे असते व पिकाची लाइव्ह फोटो ई पिक अँपद्वारे अपलोड करायची असते हंगाम २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांनी मोबाईल अँपद्वारे माहिती अपलोड करून सबमिट केलेली होती परंतु तात्रिक अडचणी निर्माण झाल्याने तलाठीमार्फत अद्ययावत झाली नसल्याने खसरा नोंद झाली नाही.पुढील कार्यवाही होण्याच्या कालावधीमध्ये तलाठी संपावर गेल्यामुळे शासनाणे दिलेल्या कालावधीत ई पिक अपडेट होऊ शकले नाही. यामुळे ज्या शेतकऱ्याचे ई पिक प्रणालीद्वारे हंगाम २०२२-२३ मध्ये खसरा नोंद झालेली नाही, अशा शेतक-यांचे सात बारा नोंद शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंद होत नाही. व सदर शेतकरी शासकीय आधारभूत धार खरेदी केन्द्रावर धान विक्रीपासून वंचित राहणार आहेत. याबाबत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असून हंगाम २०२२-२३ मध्ये ई पिक आनलाईन न झालेल्या सात बारा धारकांच्या सातबारामध्ये ऑफलाईन खसरा नोंद करून ऑफलाईन सात बारा देण्याबाबतची मागणी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांना केली आहे.यावर जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी ज्या शेतकऱ्यांचे सात बारे ई पीक नोंद(खसरा नोंद) झालेले नसेल त्यांनी आपल्या गावातील संबंधीत तलाठी यांच्याकडे जाऊन प्रमाणपत्र घ्यावे असे आदेश दिले आहे.संबंधित तलाठी यांना दिनांक 4 व 5 जानेवारी 2023 ला दोन दिवसात मौका चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सात बारे ईपीक झालेले नाहीत, त्यांनी दिनांक 4 व 5 जानेवारी 2023 ला शेतकऱ्यांनी आपल्या खसऱ्याची माहिती तलाठी यांचेकडे देण्याचे आव्हान आमदार रहागंडाले यांनी केले आहे.