सेवाशर्तीची अंमलबजावनी च्या मागण्यांना घेवुन ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हाव्यापी आंदोलन करणार

0
24

गोंदिया- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बॅंक खात्यात किमान वेतनावरिल शासन अनुदान जमा झाल्यानंतर नियमानुसार ग्रामपंचायतीने ऊर्वरित वेतन व राहणीमान भत्ता दरमाहा कर्मचाऱ्यांनाअदा करणे, वेतन व भत्त्यावरिल 8.33 टक्के भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा करणे, नियमानुसार रक्कम जमा न करणा-यां अधिकारी-यां वर कार्यवाही करणे,जलसुरक्षकांच्या कामाच्या मोबदल्यात वाढ़ करणे व या कामासाठी विभागा द्वारे मोबाइल फोन देणे, कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण व सेवाशर्तीच्या ऊल्लंघनाच्या वारंवार तक्रारी करूण सुद्धा याकड़े जिल्हा परिषदेचे ऊपमुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समित्यांचे बिडीओ सातत्याने दुर्लक्ष करत आहेत म्हणुण अशा बेजबाबदार अधिका-यांवर कार्यवाहीच्या मागणीला घेवुण जिल्ह्तील ग्राम पंचायत कर्मचारी पंचायत समितीत्यांवर व गोंदिया जिल्हा परिषदेवर बेमुदत मोर्चा व धरणे आंदोलन करणार असल्याचे निर्णय महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) च्या जिल्हा कार्यकारिणी च्या सभेत राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष काॅ.मिलिंद गनविर यांचे प्रमुख मार्गदर्शनात तथा जिल्हाध्यक्ष चत्रुघन लांजेवार यांचे अध्यक्षतेत सुकड़ी (डाकराम) येथे संपन्न सभेत घेण्यात आले. सभेत कॉ. मिलिंद गनवीर यांनी 24 नोव्हेंबर 22 ला बिड़ येथे झालेले राज्यव्यापी विजयी व संकल्प अधिवेशन, 28 दिसंबर 22 ला नागपुर विधानसभे वर झालेला प्रचंड मोर्चा व मुख्यमंत्रीबरोबर झालेल्या चर्चेत यावलकर समितीच्य सिफारशीनां मान्य
करणे शंदर्भात दिलेल्या आश्वासनाची की पुर्तता न झाल्यास मुंबई येथे होणा-या विधानसभेच्या बजेट अधिवेशनावर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती दिली.
13 फेब्रुवारी पासुन जिल्ह्तील सर्व पंचायत समित्यांवर व 1मार्च ला गोंदिया जिल्हा परिषदेवर होणारे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक रविंद्र किटे व संचालन व आभार प्रदर्शन आशिष ऊरकुड़े यांनी केले.या सभेत विष्णु हत्तीमारे, बुधराम बोपचे, ईश्वरदास भंडारी, खोजराम दरवड़े, ऊत्तम डोंगरे, विनोद शहारे, भाऊलाल कटंगकार, देवेन्द्र मेश्राम, माणिक ऊके, खुशाल बनकर,श्याम कटरे,प्रयागराज नंदरधने, किशोर नागपुरे, रूपेंद्र शेंडे, गुड्डु मेश्राम,आदि कार्यकर्ते ऊपस्थित होते.