देवरी,दि.०३: परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात संविधान कमेटीच्या माध्यमातून आपल्या देशाचे संविधान तयार करण्यात आले. तेच संविधान आता केंद्रसरकार बदलून टाकण्याची भाषा करीत आहे. या देशात आता लोकशाहीची जागा हिटलरशाहीने घेतली आहे. या हिटलरशाहीच्या माध्यमातून दडपशाहीचे राज्य येईल आणि त्यामुळे प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत हक्क आणि अधिकाराचे हनन होईल. यामुळे यामाध्न्यमातून पुन्हा देशात पारतंत्र्य येऊ पाहत आहे. देशातील लोकशाही वाचविण्यासाठी कॉंग्रेसपक्षाने या जनसंवाद यात्रेची सुरवात केली असून प्रत्येक नागरिकाने या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन देवरी-आमगाव विधानसभेचे आमदार सहसराम कोरोटे यांनी केले आहे.
देवरी तालुक्यातील हरदोली येथून या संवाद यात्रेची सुरवात आज रविवारी (दि.३) करण्यात आली त्यावेळी आमदार कोरोटे मार्गदर्शन करताना बोलत होते.
आमदार कोरोटे पुढे बोलताना म्हणाले की,काँग्रेस पक्षाने देशामध्ये एअरपोर्ट तयार केले. रेल्वेचे जाळे विणले. अनेक प्रकारचे दवाखाने, शाळा-कॉलेज तयार केले. ह्या देशाची व्यवस्था पद्ध्तशीरपणे सुरू राहिली पाहिजे, यासाठी म्हणून काँग्रेस सरकारने सर्व संस्था सुरू केला. पण त्यांना विकण्याचे काम ह्या केंद्र सरकारचा म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करीत आहे.
याउलच आमचे नेते राहुलजी गांधी ह्यांनी मागील काळामध्ये देशबचाव, भारतजोडो यात्रा३ केली. लोकांमध्ये आपापसात द्वेषभावनेऐवजी प्रेमभावना असली पाहिजे. ह्यासाठी म्हणून त्यांनी भारतजोडो यात्रा काढली. त्यासाठी त्यांनी ४ हजार ४०० किलोमीटर यात्रा संपूर्ण देशभर केली आहे. यात्रेमध्ये अनेक लोक सामील झाले. राहुलजी गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचा काम केले आहे. असेही कोरोटे यावेळी म्हणाले. आपले हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी या जनसंवाद यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेवून याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री कोरोटे यांनी केले आहे.