36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Uncategorized जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन 12 सप्टेंबरला

जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन 12 सप्टेंबरला

0
28

blank

    गोंदिया, दि.6 : जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने 12 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था फुलचूर पेठ, गोरेगाव रोड, गोंदिया येथे जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

          सदर रोजगार मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे उद्योजक सहभागी होणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी या जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

          इयत्ता 10 वी व 12 वी पास, आयटीआय, तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पात्रता असणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी आहे. यासाठी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया या कार्यालयाचे नोंदणी कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.

         अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे दुरध्वनी क्रमांक 07182-299150 यावर किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. या रोजगार मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजु माटे यांनी केले आहे.

blank