शिष्याच्या हातून गुरूचा सत्कार

0
10
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर येथे विदर्भ साहित सम्मेलन व विवेक प्रकाशनच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन

देवरी,दि.०६:शिक्षकदिनाचे औचित्य साधून तालुक्यातील बोरगाव /बाजार येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तथा एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूलचे माजी प्राचार्य डॉ. जगदीश बारसागडे यांचे हस्ते त्याचे लेखक, गुरु डॉ. हिरामण लांजे ह्याचा सत्कार करण्याची सुवर्णयोग विदर्भ साहित्य संघ नागपूर व विवेक प्रकाशनच्या वतीने  रविवार रोजी घडवून आणला.

यावेळी डॉ. बारसागडे यांनी आपले गुरूवर्य यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करून शतशः आभार मानले व आदरणीय गुरुजीच्या सातत्यमय लेखनासाठी आणि पुढील सुमंगल, सुखमय, आरोग्यदायी आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करीत शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलतांनी डॉ. बारसागडे म्हणाले की,उपरोक्त कार्यक्रमाचे औचित्य साधून आमचे गुरुजी डॉ. हिरामण लांजे की, जे झाडीपट्टीतील ज्येष्ठ लेखक, ज्यांच्या लेखणीने झाडीपट्टी रंगभूमितील अनेकांना प्रेरणा मिळाली. शहरात राहत असले तरी त्यांची ग्रामीण भागाशी घट्ट नाळ जुळलेली आहे. त्याच कळकळीतून त्यांनी झाडीपट्टीविषयी अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक लेखन केले आहे. अशा ह्या डॉ. हिरामण लांजे लेखक-गुरुजी ह्यांचा सहृदय सत्कार त्याचदिवशी मान्यवरांचे उपस्थितीमध्ये माझ्याद्वारे करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले. ज्यांनी मला माझेगांवी बोंडगाव/देवी येथील जिल्हापरिषद हायस्कूल मध्ये शैक्षणिक सण १९७४-७५ मध्ये दहावीमध्ये जीवशास्त्र ह्या विषयाचे धडे दिले.
मला आमचे गुरुजी डॉ. हिरामण लांजे लेखक ह्याचा सत्कार करण्याची सुवर्णसंधी विदर्भ साहित्य संघ नागपूर व विवेक प्रकाशनच्या सुशीला लांजे( गुरुजींच्या सौभाग्यवती) यांनी योगायोग घडवून दिल्याबद्दल मी गुरू-शिष्य ऋणानुबंधमधून शतशः आभार मानतो व आदरणीय गुरुजीच्या सातत्यमय लेखनासाठी आणि पुढील सुमंगल, सुखमय, आरोग्यदायी आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
आमचे गुरुजी डॉ. हिरामण लांजे हे झाडीपट्टीतील ज्येष्ठ लेखक यांना रमानंद या टोपणनावानेही ओळखिले जाते. त्यांनी लिहिलेले “साहित्य-सृजनामृत” हा ग्रंथ आणि “यह कैसा संकट” हा काव्यसंग्रह या दोन पुस्तकाचे प्रकाशन रविवारी विदर्भ साहित्यसंघ आणि विवेकप्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने(सौजन्याने)विदर्भ साहित्य संघाच्या दालनात नागपूर येथे आयोजित करण्यात आले असे म्हटले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, नाटककार पद्मश्री डॉ.परशुराम खुणे, लेखक व कवी डॉ.तीर्थराज कापगते,जेष्ठ साहित्यिक डॉ.नरेंद्र परिहार, गुरूजी लेखक डॉ. हरीचंद्र बोरकर, डॉ. हिरामण लांजे,प्रकाश बाळबुद्धे, माजी प्राचार्य तथ रोटरी सदस्य डॉ. जगदीश बारसागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.