‘सुरेश नागपुरे’ जवानावर आज अंत्यसंस्कार

0
2

गोंदिया : कर्तव्यावरील स्थलसेना जवानाचा हृदयविकाराच्या धक्क्याने बुधवार ६ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. सुरेश हुकलाल नागपुरे (३४) रा. तुमखेडा (खुर्द) ता. जि. गोंदिया असे मृतक जवानाचे नाव आहे. सुरेश हे लेह लडाख येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना बुधवारी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. यातच त्यांचा मृत्यू झाला.
शासकीय सोयीस्कर पार पाडल्यानंतर ८ सप्टेंबर रोजी त्यांच्या मृतदेह त्यांच्या निवासी तुमखेडा खुर्द येथे आणण्यात येणार आहे. यानंतर संध्याकाळपर्यंत शासकीय ईतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या मागे पत्नी, पाच महिन्याची मुलगी, आई-वडील, दोन भाऊ, बहीण व बराच आप्तपरिवार आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.