सरंक्षण दलात रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा एकोडी विद्यालयाच्यावतीने सत्कार

0
21

गोंदिया,दि.10– जिल्हा परिषद भारतीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय एकोडी येथील पालक सभेत कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी संरक्षण दलातील विभिन्न विभागाच्या स्पर्धात्मक परीक्षेत यश संपादन करून क्षेत्राचा नाव गौरवान्वित केल्याबद्दल विद्यार्थीसह त्यांचा आई वडिलांचा सत्कार करण्यात आला.
यात सौरभ ठाकूर व सागर रवींद्र बिसेन धामणेवाडा,पियुष पटले,आदित्य अंबुले रामपुरी,पंकज पटले सेजगाव,दुर्गेश पटले सेजगाव,आदेश सूरजलाल पारधी दांडेगाव, विनय पटले रामपुरी, शैलेश रिखीलाल गावळे पैकाटोला,निकिता धर्मसिंह नागपुरे सहेसपुर आदी विद्यार्थीचा समावेश आहे.कार्यक्रमात धम्मरक्षीत मंडळ एकोडीच्या वतीने शाळा समितीचे सदस्य किरणकुमार मेश्राम यांनी संविधान पुस्तक भेट दिली. व उपस्थितांना भारतीय संविधानाचे महत्व काय हे समजावून दिले.जिल्हा परिषद सदस्य श्रीमती अश्विनी पटले यांनी चांदीचे नाणे देवून तर शाळेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक कव्हाणे व त्यांच्या सर्व शिक्षकवृंदानी पालकांच्या सांगितलेल्या काही समस्याचे त्वरित उत्तर देवून समाधान केले.तर काही समस्याचे नियोजन करून त्या समस्या मार्गी लावू असे आश्वासन दिले.सर्वांगीण विकासाचे ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक दोन महिन्यात पालक सभा घेवून शिक्षक,विद्यार्थी व पालक यांचा संवादातून येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय योजना करून सर्वांगीण विकास होईल अशी भावना सर्वांकडून व्यक्त करण्यात आली.तसेच शाळेच्या दुरुस्तीचे कामा बद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आली.सदर सभेचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार (बंटी) पटले, प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्य अजाबराव रीनायत, कुंदा गंगाधर रीनायत अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ,धर्मेंद्र कनोजे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिति, श्रीराम बाळणे शा.स.स.,शाळेचे मुख्याध्यापक कव्हाणेर, किरणकुमार मेश्राम शा.स.स.,रविकुमार (बंटी) पटले शा.स.स.,मोनु शेख शा.स.स,अशोक अंबुले तसेच शाळा समितीचे सदस्य, व्यवस्थापन समिती सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन वानखेडे मैडम व पटले सर यांनी केले