देवरीच्या शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन

0
339

देवरी,दि.२९- स्थानिक छत्रपती शिवाजी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयीच्या वतीने एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे थाटात आयोजन काल शनिवारी (दि.२) नागपूर येथे करण्यात आले होते.
कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज भुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहलप्रमुख  एस. जी. आंबुलकर व इतर प्राध्यापक यांच्या देखरेखीखाली ही सहल गोयनका फॉर्म एडवेंचर कम वॉटर पार्क महालगाव / नागपुरला येथे आज सकाळी निघाली. अभ्यासामध्ये तणावातून मुक्त ठेवण्यासाठी अभ्यासासोबत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आज ८० विद्यार्थ्यांसोबत या सहलीचे आयोजन करण्यात आले.
या एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थाध्यक्ष झामसिंग येरणे, सचिव अनिलकुमार येरणे, प्राचार्य मनोज भुरे व पालकांनी शैक्षणिक सहलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.