चिचगड,दि.17:- ‘स्वच्छ भारत..स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासन प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते.गाव आणि शहर स्वच्छतेवर मोठा भर देण्यात येते.मात्र देवरी तालुक्यातील चिचगड गावाची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने चिचगडच्या नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न येरणीवर आला आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती अन गावात ठिकठीकाणी अस्वच्छतेचे साम्राज्यामुळे भविष्यात कोरोनाच्या प्रादुर्भावास थांबवितांना इतर आजारांची लागण होण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे.चिचगड ग्रामपंचायतील स्वच्छतेसाठी निधी तर मिळतो; मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो हे गावातील अस्वच्छतेवरुन स्पष्ट होते.चिचगड गावातील अनेक भागातील नाल्या घाणीने तुडूबं भरलेल्या असून ते घाणपाणी रस्त्यावर वाहताना बघावयास मिळते.काही वार्डात कचरा अस्ताव्यस्त पसरुन रोगाला आमंत्रण देण्याचे काम करीत आहे. गाव स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक ग्रामपंचायतीकडून केली जात असली तरी गावात अनेक ठिकाणी असलेली घान व कचरा हे ग्रामपंचायतीच्या स्वच्छता मोहिमेची धिंडवडे काढणारे ठरले आहे.