गोंदिया,दि.17– जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदियाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेच्या आज 17 ऑक्टोबर रोजी प्राप्त अहवालातून जिल्ह्यात नव्याने आणखी 112 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. उपचार घेत असलेल्या 38 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली.गोंदिया येथील 62 वर्षीय रुग्णाचा काल रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
माझे कुटुंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृती या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील आरोग्य तपासणीला 16ऑक्टोबरपासून सुरुवात करण्यात आली आले.
जिल्ह्यात उपचारातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 87.59 टक्के आहे.बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.27 टक्के इतका आहे.बरे होणाऱ्या बाधित रुग्णांचे विचार सकारात्मक करण्यासाठी आतापर्यंत 1600 पेक्षा जास्त रुग्णांचे समुपदेशन करण्यात आले.
जिल्ह्यात आज नव्याने आणखी 112 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -46, तिरोडा तालुका -32 , गोरेगाव तालुका-01,आमगाव तालुका-16, सालेकसा तालुका-00, देवरी तालुका- 03, सडक/अर्जुनी तालुका -06, अर्जुनी/मोरगाव-03 आणि बाहेर जिल्हा/इतर राज्यातील पाच रूग्णांचा अशी आहे.
आतापर्यंत आढळलेले बाधित रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -4929, तिरोडा तालुका -1088, गोरेगाव तालका -358,आमगाव तालुका -572,सालेकसा तालुका -368, देवरी तालुका-362, सडक/अर्जुनी तालुका-360,अर्जुनी/मोरगाव तालुका-377 आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले- 95 रुग्ण आहे.असे एकूण 8509 रुग्ण बाधित आढळले.
आज 17 ऑक्टोबर रोजी 38 रूग्णांनी कोरोनावर मात केली. तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका-27, तिरोडा तालुका-04, गोरेगाव तालुका-00, आमगाव तालुका -05, सालेकसा तालुका-00, देवरी तालुका-02, सडक/अर्जुनी तालुका – 00 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-00 असा आहे.
7549 रुग्णांनी कोरोनावर आतापर्यंत मात केली आहे.ती रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -4408, तिरोडा तालुका- 995, गोरेगाव तालुका-322,आमगाव तालुका-501,सालेकसा तालुका- 353, देवरी तालुका-304,सडक/अर्जुनी तालुका-290, अर्जुनी/मोरगाव तालुका-296 आणि इतर-80 रुग्णांचा समावेश आहे.
क्रियाशील रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका -455,तिरोडा तालुका-77, गोरेगाव तालुका- 32,आमगाव तालुका-65, सालेकसा तालुका -13, देवरी तालुका-56, सडक/अर्जुनी तालुका- 67,अर्जुनी/मोरगाव तालुका-79 आणि बाहेर जिल्हा व बाहेर राज्यातील 5 असे एकूण 849 रुग्ण कोरोना क्रियाशील आहे.
क्रीयाशील असलेल्या रूग्णांपैकी 357 रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-175, तिरोडा तालुका-25, गोरेगाव तालुका -17,आमगाव तालुका -36 , सालेकसा तालुका-09,देवरी तालुका -42,सडक/अर्जुनी तालुका-22,
अर्जुनी/मोरगाव तालुका-31रुग्ण आहेत.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 87.59 टक्के आहे.बाधीत रुग्णांचा मृत्यु दर हा 1.27 टक्के असा आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात 111 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-66, तिरोडा तालुका-16, गोरेगाव तालुका-4, आमगाव तालुका-6, सालेकसा तालुका-2 देवरी तालुका-2, सडक/अर्जुनी तालुका-3, अर्जुनी/मोरगाव तालुका -2 व बाहेर जिल्हा व राज्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे.
गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण 35024 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 26684 नमुने निगेटिव्ह आले. तर 5362 नमुने पॉझिटिव्ह आले आहे. 124 नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित आहे.
जिल्ह्यात गृह विलगिकरणात 152 व्यक्ती आणि संस्थात्मक विलगीकरणात 2 व्यक्ती आहे.कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत 30624 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 27567 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. 3057 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.