गोंदिया जिल्ह्यात दुकाने सकाळी 09.00 ते रात्री 09.00 पर्यंत

0
217

गोंदिया:दि17-कोरोना विषाणूचा कोव्हीड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च , 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदींची अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमीत केलेली आहे . त्याबाबतची नियमावली संदर्भीय 2 अन्वये प्रसिध्द केली आहे आणि जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषीत केलेले आहे . त्या अर्थी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून उपरोक्त दिनांक 31.10.2020 पर्यंतच्या लॉकडाऊन संदर्भात संदर्भीय आदेश क्र . 15 अन्वये मार्गदर्शक सुचना निर्गमीत करण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने या कार्यालयाचे उपरोक्त संदर्भीय आदेश क्र . 16 अन्वये गोंदिया जिल्ह्याकरीता आदेश निर्गमीत करण्यात आले आहे . तसेच शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे या स्तरावर वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहे . परंतू महाराष्ट्र शासनाने दिनांक 31.10.2020 पर्यंतच्या लॉकडाऊनच्या कालावधीत उपरोक्त संदर्भीय क्र . 17 अन्वये खालीलप्रमाणे बाबी समाविष्ट करण्यात आलेल्या असून उपरोक्त संदर्भीय आदेशांमध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणेसह व खालील सर्व उपक्रम अटी व शर्तीसह सुरू राहतील . त्यात गर्दी कमी / नियंत्रीत करण्याच्या उद्देशाने प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील बाजारपेटा,दुकाने 2 तास अतिरीक्त सुरू ठेवण्याची सकाळी 09.00 ते रात्री 09.00 पर्यंत परवानगी दिनांक 15.10.2020 पासून देण्यात आली आहे .

प्रतिबंधीत क्षेत्र Containment Zone– आदेश दिनांक 19.05.2020 व दिनांक 21.05.2020 मध्ये वर्गीकरण करण्यात आलेल्या राज्यातील प्रतिबंधीत क्षेत्र पुढील आदेशापर्यंत बंद राहतील . ii . केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या निर्देशान्वये प्रतिबंधीत क्षेत्रातील सिमांकन व कार्यवाही पुढील आदेशापर्यंत लागु राहील .
जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेर खालीलप्रमाणे उपक्रम सुरू राहतील –
1 गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासास बंदी राहील .
2 शाळा , महाविद्यालये , शैक्षणीक व कोचोंग संस्था इ . दिनांक 31.10.2020 पर्यंत बंद राहतील
a . ऑनलाईन व दुरस्थ शिक्षणाची परवानगी कायम राहील व त्यास प्रोत्साहित केले जाईल .
b . शैक्षणीक संस्थेतील 50 टक्के क्षमतेने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी teaching and non – teaching stuff यांना ऑनलाईन शिक्षण / Tele counseling आणि संबंधीत कामाकरीता एकाचवेळी उपस्थित राहण्याची परवानगी दिनांक 15.10.2020 पासून देण्यात आली आहे . तथापी याकरीता आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागामार्फत SOP निर्गमीत करण्यात येईल .

राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था , औद्योगीक प्रशिक्षण संस्था ( ITIS ) , अल्प मुदतीचे प्रशिक्षण केंद्र राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाद्वारे किंवा राज्य कौशल्य विकास अभियानाद्वारे किंवा भारत सरकारचे मंत्रालय किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे नोंदणीकृत येथील कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षणास परवानगी देण्यात येईल .
●उद्योजकता आणि लघुउद्योग विकास राष्ट्रीय संस्था ( NIESBUD ) , भारतीय उद्योजकता संस्था ( IE ) आणि त्यांचे प्रशिक्षण देणाऱ्यांना परवानगी देण्यात येईल . उपरोक्त उपक्रम दिनांक 15.10.2020 पासून सुरू राहतील , तथापी याकरीता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत SOP निर्गमीत करण्यात येईल
● ज्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन / दूरस्थ शिक्षण या प्राधान्य दिले जाणाऱ्या अध्यापन पध्दती आहे . त्यास प्रोत्साहीत केले जाईल . तथापि , विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवाहातील केवळ संशोधन अभ्यासक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण संस्था ज्यांना प्रयोगशाळेतीन / प्रायोगीक कामांची आवश्यकता असेल त्यानुसार दिनांक 15.10.2020 गसून सुरू ठेवण्याची खालीलप्रमाणे परवानगी राहील
●.केंद्रीय अर्थसहायित उच्च शिक्षण संस्थेकरीता , संस्था प्रमुख स्वतः समाधान करतील की संशोधक आणि विज्ञान व तंत्रज्ञानातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत । प्रयोगात्मक कामासाठी आवश्यक गरज आहे .
●. इतर सर्व उच्च शिक्षण संस्था उदा , राज्य विद्यापीठ , खाजगी विद्यापीठ इ . ठिकाणच्या प्रयोगशाळा / प्रयोगात्मक केंद्र काम फक्त संशोधक आणि विज्ञान व तंत्रज्ञानातील पदव्युत्तर विद्याथ्यांकरीता सुरू राहतील . सर्व शासकिय व खाजगी ग्रंथालयांना कोव्हीड -19 संदर्भातील सामाजिक अंतराचे व स्वच्छतेचे निकष पाळून दिनांक 15.10.2020 पासून सुरू करण्याची परवानगी देण्यात येत आहे . तथापी याकरीता उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत SOP निर्गमीत करण्यात येईल .
विवाह समारंभाकरीता . वैयक्तीक कौटुबिक कार्यक्रमाकरीता आणि संबंधीत कार्यक्रमाकरीता 50 पेक्षा जास्त व अंत्यसंस्काराकरीता 20 पेक्षा जास्त लोंकाची उपस्थिती राहवयास नको , मनोरंजनाकरीता बाग , उद्याने आणि सार्वजनिक मोकळ्या जागा यांना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे .
● प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील व्यवसायीक प्रदर्शने ( B2B ) सुरू टेवण्याची परवानगी दिनांक 15.10.2020 पासून देण्यात येत आहे . तथापी याकरीता उद्योग विभागामार्फत SOP निर्गमीत करण्यात येईल .
●प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील स्थानिक आठवडी बाजार प्राण्यांसह सुरू ठेवण्याची परवानगी दिनांक 15.10.2020 पासून देण्यात आली आहे . तथापी संबंधीत ग्रामीण / शहरी संस्थेमार्फत SoP निर्गमीत करण्यात येईल आणि कोव्हीड -19 संदर्भातील शासनाद्वारे निर्गमीत करण्यात आलेल्या सुचनांचे नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील .