मराठी कवी लेखक संघटनेच्या अध्यक्षपदी प्रमोदकुमार अणेराव

0
102

भंडारा- जिल्हा कवी लेखक संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी,कथाकार व चित्रकार प्रमोदकुमार अणेराव यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. या संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष सुप्रसिद्ध कादंबरीकार दिनकर दाभाडे यांनी ही निवड केली असून जिल्ह्याकरिता कार्यकारणी घोषित करण्यात आलेली आहे.
यात भंडारा कवी लेखक संघटनेच्या उपाध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी, नाटककार प्रा.डॉ. सुरेश खोब्रागडे लाखनी, सचिवपदी युवा कवी व गझलकार विवेक कापगते मोहाडी, कोषाध्यक्ष म्हणून कवी व पत्रकार मनोज केवट (मनोज सुमित्रा) गणेशपूर व संघटक म्हणून सुप्रसिद्ध कवियित्री अर्चना मोहनकर, तुमसर यांची निवड करण्यात आलेली आहे. या कवी लेखक संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व लेखक अमृत बन्सोड भंडारा यांची निवड केंद्रीय समितीने केलेली आहे. कार्यकारिणीत सदस्य म्हणून प्रा.आशा खंडाईत अड्याळ, प्रा.भगवंत शोभणे पवनी, डॉ.अनिल बोपचे कोंढा कोसरा, डॉ.जगजीवन कोटांगले जवाहरनगर, कवियित्री कविता कठाणे भंडारा, युवा लेखक देवानंद घरत लाखांदूर, आणि बसप्पा फाये भंडारा यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कवी, लेखक, समीक्षक, विचारवंत यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य व न्यायहक्क जपण्यासाठी व ते मिळवून देण्यासाठी या कवी लेखक संघटनेची निर्मिती करण्यात आलेली आहे. या कार्यकरणीचे प्रसिद्ध लेखिका अरुणा सबाने, केंद्रीय अध्यक्ष दिनकर दाभाडे, कवी गिरीश सपाटे, कवी कृपेश महाजन, कवी डॉ . विशाल इंगोले यांनी अभिनंदन केले आहे.