गडचिरोली, दि. 19 ऑक्टो. : आज तब्बल 131 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच गडचिरोली शहरातील नवीन 43 कोरोना बाधितांसह जिल्हयात 80 नवीन कोरोना बाधितांची भर पडली. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 4626 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 3802 वर पोहचली. तसेच सद्या 787 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 37 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन 1 मृत्यू झालेला 61 वर्षीय पुरूष रूग्ण आमगाव वडसा येथील असून तो उच्च रक्तदाब व मधुमेह पिडीत होता. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.19 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 17.01 तर मृत्यू दर 0.80 टक्के झाला.
आज कोरोनामुक्त झालेल्या 131 रूग्णांमध्ये गडचिरोली 53, अहेरी 8, आरमोरी 24, भामरागड 0, चामोर्शी 7, धानोरा 2, एटापल्ली 4, मुलचेरा 1, सिरोंचा 5, कोरची 7, कुरखेडा 1 व वडसा मधील 19 जणांचा समावेश आहे.
नवीन 80 बाधितांमध्ये गडचिरोली 43, अहेरी 4, आरमोरी 6, भामरागड 0, चामोर्शी 2, धानोरा 0, एटापल्ली 6, कोरची 3, कुरखेडा 6, मुलचेरा 1, सिरोंचा 0 व वडसा येथील 9 जणांचा समावेश आहे.
यामध्ये गडचिरोली 43 मध्ये कॅम्प एरिया 1, इतर जिल्हयातील 3, सहकारी राईस मिल जवळ 1, महिला महाविद्यालयाजवळ 1, भाट गिरणीजवळ 3, एस मार्ट समोर 1, रामनगर 2, वनश्री कॉलनी 3, नवेगाव 3, रेड्डी गोडावून जवळ 2, पोलीस स्टेशन मागे 1, आनंदनगर 1, टी पाँईंट चौक जवळ 3, गोकुळनगर 4, चामोर्शी रोड 1, इंदिरानगर 1, गोविंदपूर 1, सोनापूर कॉम्प्लेक्स 4, रेव्हून्यू कॉलनी 2, शिवाजी वार्ड 1, शांतीनगर 1, शहरातील इतर 1, तलावाजवळ 1 व आटीआय चौकाजवळ 1 जण बाधित आढळला आहे.
इतर तालुक्यांमध्ये अहेरी 4 मध्ये महागाव 1 व शहरातील इतर 3 जणांचा समावेश आहे. आरामोरी 6 मध्ये सर्व शहरातील आहेत. चामोर्शी 2 मधील 1 भेंडाळा व 1 स्थानिक आहे. एटापल्ली 6 मध्ये जारावंडी 3 जवान, उटापल्ली पोलीस 1, स्थानिक 1 व तालुका आरोग्य विभाग 1 जणांचा समावेश आहे. कोरची मधील 3 मध्ये सर्व स्थानिक आहेत. कुरखेडा 6 मध्ये स्थानिक 3, गोठणगाव 2, आंधाळी 1 जणाचा समावेश आहे. वडसा येथील 9 मध्ये सीआरपीएफ 2, आशिर्वाद कॉलनी 1, तुकूम वार्ड 1, कोंढाळा 1, कन्नमवार वार्ड 4 जणांचा समावेश आहे.