गोंदिया आणखी 74 पॉझिटिव्ह : 40 कोरोनामुक्त

0
382

गोंदिया,दि.20 (ृ जिल्ह्यात आणखी 74 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 20 ऑक्टोबर रोजी प्राप्त झाला.अर्जुनी/मोरगाव येथील 24 वर्षीय बाधित रुग्णाचा 15 ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान अर्जुनी/मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. 40 रुग्ण औषधोपचारातून बरे झाल्याने आज सुट्टी देण्यात आली.

आज नव्याने 74 कोरोना बाधित रुग्ण आढळले. तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -46, तिरोडा तालुका -00, गोरेगाव तालुका -00,आमगाव तालुका-05, सालेकसा तालुका-00, देवरी तालुका- 11 सडक/अर्जुनी तालुका -04, अर्जुनी/मोरगाव-07 आणि बाहेर जिल्हा व बाहेर राज्यातील एक रुग्ण आज आढळून आला आहे.

कोरोना बाधित रुग्ण आतापर्यंत जे आढळून आले आहे ते तालुकानिहाय पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका -5075, तिरोडा तालुका -1121, गोरेगाव तालका- 365 ,आमगाव तालुका -615,सालेकसा तालुका -368, देवरी तालुका-398, सडक/अर्जुनी तालुका-366,अर्जुनी/मोरगाव तालुका-412 आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले- 99 रुग्ण आहे.असे एकूण 8819 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.

कोरोनावर आज 40 जणांनी मात केली.तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका-25, तिरोडा तालुका-09, गोरेगाव तालुका-00, आमगाव तालुका -01, सालेकसा तालुका-01, देवरी तालुका-01, सडक/अर्जुनी तालुका – 01 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-02 असा आहे.

आतापर्यंत कोरोनातून 7701 रुग्ण मुक्त झाले.ती रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -4484, तिरोडा तालुका- 1011,गोरेगाव तालुका -324,आमगाव तालुका -526,सालेकसा तालुका- 356, देवरी तालुका-317,सडक/अर्जुनी तालुका-299, अर्जुनी/मोरगाव तालुका-304 आणि इतर-80 रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका -525,तिरोडा तालुका-94,गोरेगाव तालुका- 37,आमगाव तालुका-83,सालेकसा तालुका -10, देवरी तालुका-79, सडक/अर्जुनी तालुका- 64,अर्जुनी/मोरगाव तालुका-105 आणि बाहेर जिल्हा व बाहेर राज्यातील 09 असे एकूण 1006 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.

क्रियाशील असलेल्या रूग्णांपैकी 389 रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-213, तिरोडा तालुका-13, गोरेगाव तालुका -02,आमगाव तालुका-21 , सालेकसा तालुका-12,देवरी तालुका – 63,सडक/अर्जुनी तालुका- 10, अर्जुनी/मोरगाव तालुका-55 रुग्ण आहेत.

जिल्ह्यातील बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 87.06 टक्के आहे.बाधीत रुग्णांचा मृत्यु दर हा 1.23 टक्के आहे.

जिल्ह्यात 112 कोरोनाबाधित रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-66, तिरोडा तालुका-16, गोरेगाव तालुका-4, आमगाव तालुका-6, सालेकसा तालुका-2 देवरी तालुका-2, सडक/अर्जुनी तालुका-3, अर्जुनी/मोरगाव तालुका -3 व बाहेर जिल्हा व राज्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण 35630 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 27118 नमुने निगेटिव्ह आले. तर 5552 नमुने पॉझिटिव्ह आले आहे.168 नमुन्यांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

जिल्ह्यात गृह विलगिकरणात 136 आणि संस्थात्मक विलगीकरणात 2 व्यक्ती आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीतून आतापर्यंत 31578 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 29380 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. 3198 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 16 चमू आणि 14 सुपरवायझर जिल्ह्यातील एकूण 14 कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-01,आमगाव तालुका -00 सालेकसा तालुका-00, देवरी तालुका -03, सडक/अर्जुनी तालुका -01, गोरेगाव तालुका-00, तिरोडा तालुका -09 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका -00 असे कंटेंटमेंट झोन आहे.

कोरोना वॉर रूममधून रुग्णांना 24 तास सेवा उपलब्ध राहणार आहे. रूग्णांना काही समस्या असल्यास 8308816666 आणि 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.