चिमुर,दि.21:- चिमुर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या समितीवर श्रीहरी सातपुते यांची सद्स्यपदी निवड करण्यात आली आहे.श्रीहरी सुभाष सातपुते हे सामाजिक, राजकीय, क्षेत्रात कार्य करीत आहेत.अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे जिल्ह्य कार्यध्यक्ष आहेत, सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेच्या मध्यमातुम तेली समाजाचे युवा नेतृत्व म्हणून काम करीत आहेत.शिवसेना पक्षातून राजकारणाची सुरुवात झाली असून आजही ते शिवसेना पक्षासोबत एकनिष्ठ आहेत.त्यानी नियुक्तीचे श्रेय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख नितिन मत्ते व उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते यांना दिले आहे.
त्यांच्या नियुक्तिबद्दल रमेश भिलकर, बंडू पारखी, सुधीर ननावरे, किशोर उकुंडे, उमेश हिंगे, यशवंत वाघे, संजय खाटिक, नीलेश बेलखेड़े, पुष्पा हरने, कंचन खाटीक, तुलसीदास भुरसे, रोशन जुमड़े, योगेश सहारे, प्रमोद राउत, शुभम बारसागड़े, रवि सातपुते, गुणवंता चटपकार, अंकुश जुमड़े, अमर वांढरे, प्रकाश सातपुते, रेवन साठोने, लखन चटपकार, यानी अभिनंदन केले.