जागा आम्ही देणार नाही, बोपाबोडी ग्रामस्थांचे सरकारविरोधात आंदोलन

0
204

सडक अर्जुनी,दि.21ःतालुक्याअंतर्गत येणाऱ्या बोपाबोडी गावातील नागरिक तीन पिढ्यांपासून वन विभागाच्या 250 एकर जागेचा वापर करत आहेत. मात्र, वनविभागाने सदर जागा पुन्हा परत मागितल्याने गावकऱ्यांनी त्याविरोधात मंगळवार(दि.20) आंदोलने केले. आंदोलनकर्त्यांची धास्ती घेत मोजणी करणारे अधिकारी हे गावात आलेच नाहीत. त्यामुळे, आधी मोका पंचनामा करावा, मोजमाप करावे अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे.

सडक अर्जुनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या बोपाबोडी गावात मागील तीन पिढ्यांपासून जवळपास ५७० कुटूंब राहत आहेत. गावालगत वनविभागाची २५० एकर जागा आहे. बोपाबोडी निवासी तीन पिढ्यांपासून या जागेचा वापरत करत आहेत. गावकऱ्यांनी २००२ मध्ये या जागेवर वृक्षारोपण करून द्या म्हणून वन विभागाला निवेदन दिले होते. मात्र, वन विभागाने वृक्षारोपण केल्यानंतर नजीकच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर श्रीरामनगर गावाचे येथे पुर्नवसन केले. त्यांना ही जागा शेतीकरता द्यायची होती. मात्र, बोपाबोडी गामस्थ ही जागा द्यायला तयार नाहीत.

या जागेवर गावातील १० च्या वर कुटूंब राहत आहेत. जागा गेल्यानंतर ते कुठे राहणार, असा प्रश्न गावकऱ्यांनी वन विभागाला केला आहे. तर, आज गावात वन विभागाची चमू जमीन मोजमाप करण्याकरता येणार असल्याने गावकऱ्यांनी आंदोलनास सुरवात केल्याची माहिती वनविभागाला मिळताच गावकऱ्यांची समजूत घालण्याकरता पोलिसांना पाठवण्यात आले. मात्र वन अधिकरी गावात फिरकले देखील नाही. बोपाबोडी गावातील नागरिकांची उपजीविका याच २५० एकर जागेवर आहे. गावातील अनेक कुटुंब या जागेवर अनेक पिढ्यांपासून शेती करतायेत. त्यामुळे, ही जागा गावकऱ्यांनी वन विभागाला द्यायला नकार दिला असून आता वन विभाग ग्रामस्थांची कशी समजूत घालतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमच्या गावालगत जे नविन गाव श्रीरामनगर आहे.या नविन गावाला आमची जी सिमांकन आहे म्हणजे आमचे जे झुडपी जंगल आहे.ते शासनाने त्यांचे नावे दिले आहे.ती आम्हाला द्यायचे नाही.कारण आमच्या संपूर्ण ग्रामवासियांचे जीवन या जंगलावर अवलंबून आहे.जवळपास सहा गट नविन गाव श्रीरामनगरला जात आहेत ते जाता कामा नये.
*रंजना गोबाडे सरपंच बोपाबोडी
आमच्या गावची २५० एकर जागा शासनाने बिना चौकशी केल्याने पुनर्वसीत श्रीरामनगर या गावाला दिलेली आहे.परंतु ती जागा जि.प.शाळेचे आवारभिंतसाठी,प्रेत विसावा गुरे चराई, मुलांचे खेळाचे मैदान,फिरण्याची जागा,सरपण,तेंदुपत्ता यासाठी ही जमीन आवश्यक आहे .याची चौकशी न करता वनविभागाने आणि ग्रामवासियांना माहिती न देता नविन गाव श्रीरामनगरला दिली आहे.याचा संपूर्ण गावकऱ्यांचा विरोध करीत आहे. वैशाली रामटेके उपसरपंच बोपाबोडी
आमचा विरोध हा श्रीरामनगरला नाही.आमची ही लडाई शासनाविरूद्ध आहे.शासनाने मोका चौकशी न करता आमच्यावर खुप मोठा अन्याय केला आहे.यात काही राजकीय लोकांचे हात असू शकते कारण ती त्यांची बाजू आहे.त्यानी ते मांडले त्यांची मागणी होती.परंतू आमचे गावी येऊन मोका चौकशी न करता गावकऱ्यांवर मोठा अन्याय केला.जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण गावकरी या लढ्याचे विरुद्ध उभे राहू.*प्रकाश कापगते (गावकरी)बोपाबोडी