गोंदिया=आदिवासी, नक्षलग्रस्त असलेला गोंदिया जिल्ह्यात आपण यापूर्वीही अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्य केले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या परिस्थितीची जाण आहे. पोलिस म्हटले की सर्वसामान्य नागरिक धजावत असतात. परंतु नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाप्रती विश्वास अधिक दृढ करणे व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे यावर आपला विशेष भर राहणार आहे. असे मत नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.
जिल्हा पोलिस प्रशासनाने गत महिन्याभरात अनेक महत्वपूर्ण गुन्ह्यांचा तपास पूर्ण करुन गुन्हेगारांना गजाआड केले. याशिवाय नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यात नक्षली कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही ठोस निर्णय घेतले. यासंदर्भात त्यांनी आपल्या कायार्चा आढावा जिल्हा पोलिस मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की,
चिचगड पोलिस ठाण्यातंर्गत कोटजंभोरा जंगल परिसरात थोरल्या भावासह तिघांनी केलेल्या धाटक्या भावाचे खून प्रकरण, सालेकसा पोलिस ठाण्यातंर्गत पुजारीटोला धरणात मित्रांनी केलेला रितीक चुटे याचा खून तसेच शहर पोलिस ठाण्यातंर्गत लालपहाडी तलाव र्मुी येथे प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून केलेला खून हे तिन्ही प्रकरण उलगडले असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. रावणवाडी पोलिस ठाण्यातंर्गत मुरपार ते बघोली दरम्यान दुचाकीस्वारांना लुटणार्या दोघांना तसेच दासगाव ते निलज दरम्यान तेढवा येथील केवळराम तुरकर यांना लुटणार्या दोघांना अटक करण्यात आली आहे. रामनगर पोलिस ठाण्यातंर्गत कन्हारटोली येथील अमरसिंग सुरजीतसिंग गांधी यांचे १0 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करणार्या आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. तर शहर पोलिसांनी कस्तुरबा वॉर्डातील सोनू दीपक रंगारी याच्या घरी घरफोडी करणार्या आरोपींना मुद्येमालासह ताब्यात घेण्यात आल्याची माहिती यावेळी पानसरे यांनी दिली. याशिवाय जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुनियोजित होण्यासाठी योग्य नियोजन झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबत जिल्ह्यात नक्षल कारवाया घडूच नये, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन सज्ज असल्याचे सांगून पोलिस अधीक्षक पानसरे यांनी सप्टेंबर महिन्यातील नक्षल कारवायांची माहिती दिली. २२ सप्टेंबरला देवरी येथील नक्षल ऑपरेशन सेल तसेच सी-६0 पथकातील अधिकारी व कर्मचार्यांनी कोसबी जंगलातून नक्षलवाद्यांनी पेरुन ठेवलेले साहित्य तसेच याच परिसरात २७ सप्टेंबर रोजी निळ्या रंगाचा प्लास्टीक ड्रम, सुपर पॉवर जिलेटीन, जीवंत इलेक्ट्रीक डेटोनेटर, लोखंडी पत्रे व खिळ, काळा व पिवळ्या रंगाच्या इलेक्ट्रिक बॅटर्या, प्रेशर कुकर असा स्फोटक साहित्य जप्त करून नक्षलवाद्यांचा डाव उधळून लावल्याचेही पानसरे यांनी सांगितले.