अर्जुनी मोरगाव,दि.22ः- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विविध प्रश्नांवर खासदार सुनील मेंढे यांनी अर्जुनी येथील पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेत केंद्राच्या सर्व योजनांची अमलबंजावणी करण्याच्या सुचना दिल्या.बैठकीला उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे,तहसिलदार व गटविकास अधिकारी, उपस्थित होते.या बैठकीत पिक विमा, कोरोना महामारीचा नायनाट तसेच शासनाने जप्त केलेल्या रेती घरकुलांसाठी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. काही शेतकèयांचा पीक विम्याचा हप्ता बँकांनी कापुन घेतला. मात्र ते संबंधित विमा कंपनी कडे जमा केले नाहीत. ते शेतकरी पिक विम्याच्या संरक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा सर्वांची माहिती घेऊन त्यांना मदत करण्याचे निर्देश खासदार मेंढे यांनी तालुका कृषी अधिकाèयांना दिले. कीड व अन्य कारणांमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकèयांना ही पिक विमा योजनेचा फायदा होईल, यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. धान खरेदी केंद्रावर येत असलेल्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. तातडीने अतिरिक्त धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत सूचना जिल्हा पणन अधिकारèयांना पत्राद्वारे दिल्या.शासनाद्वारे जप्त करून साठवून ठेवलेली रेती घरकुलासाठी योग्य व स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी जेणे करून पंतप्रधान मोदींचे प्रत्येकाला घर हि कल्पना साकार होण्यास मदत होवू शकेल, असे मत या वेळी खा. मेंढे यांनी व्यक्त केले. कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी मास्क न वापरता फिरणाèया वर कडक कार्यवाही करावी, कारण कार्यवाही होणार नाही, तोपर्यंत कोरोना नियंत्रणात येणे शक्य नाही, असेही त्यांनी सांगितले. बैठकीला रचनाताई गहाणे,अरविंद शिवणकर, लायकराम भेंडारकर, डॉ. गजाननराव डोंगरवार, रघुनाथजी लांजेवार, उपविभागातील सर्व तहसीलदार, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य व कृषी अधिकारी असे विविध विभागांचे अधिकारी व नागरिक या बैठकीला उपस्थित होते.